शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

सैन्य भरती : ४०७ उमेदवारांची वैद्यकीय चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:30 IST

रत्नागिरी : शहरात सध्या सैन्य भरतीच्या अनुषंगाने उमेदवारांची शारीरिक क्षमता, कागदपत्रांची छाननी आणि वैद्यकीय चाचणी घेतली जात आहे. गेल्या ...

रत्नागिरी : शहरात सध्या सैन्य भरतीच्या अनुषंगाने उमेदवारांची शारीरिक क्षमता, कागदपत्रांची छाननी आणि वैद्यकीय चाचणी घेतली जात आहे. गेल्या पाच दिवसांत १,५७४ उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली आहे. शुक्रवारी भरती प्रक्रियेला सुटी देण्यात आली.१७ नोव्हेंबरपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर विविध जिल्ह्यांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. १७ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड, लातूर, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांतून आॅनलाईन अर्ज केलेले उमेदवार या भरतीत सहभागी झाले होते. आतापर्यंत आलेल्या एकूण २३,१२२ उमेदवारांपैकी कागदपत्रांची योग्य पूर्तता करून धावण्याच्या प्रक्रियेत सहभागी झालेल्या १८,००८ उमेदवारांपैकी वैद्यकीय चाचणीसाठी २,०१० उमेदवार पात्र ठरले आहेत. दरदिवशी कागदपत्रांची तपासणी, शारीरिक चाचणी झाल्यानंतर यात पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची दुपारनंतर वैद्यकीय चाचणी घेण्यात येते. गेल्या पाच दिवसांत १,५७४ उमेदवारांची वैद्यकीय तपासणी पुर्ण झाली आहे. शुक्रवारी भरती प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती.शनिवारी सांगलीतील चार तालुक्यांतील उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. यावेळी उर्वरित उमेदवारांची वैद्यकीय चाचणी होईल.वैद्यकीय चाचणी१७ नोव्हेंबरपासून दुपारनंतर पात्र उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेण्यात येते. १७ रोजी १७३, १८ रोजी २७९, १९ रोजी ३६६, २० रोजी ३४९ आणि २१ रोजी ४०७ अशा एकूण १५७४ उमेदवारांची आतापर्यंत वैद्यकीय चाचणी घेण्यात आली आहे.