शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत पारा चढला, सतर्कतेच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 18:20 IST

गतवर्षी तब्बल तीन वादळे आणि नोव्हेंबरपर्यंत सुरू असलेल्या अतिवृष्टीचा सामना केलेल्या कोकणातील वातावरण गेल्या आठवडाभरात पूर्णपणे बदलून गेले आहे. गुरूवारी ३६ अंशांपर्यंत तापमान वाढल्याने आधीच हैराण झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. त्यासाठी सतर्कतेच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देरत्नागिरीत पारा चढला, सतर्कतेच्या सूचना ३६ अंशांपर्यंत तापमान वाढल्याने हैराण

मनोज मुळ्ये रत्नागिरी : गतवर्षी तब्बल तीन वादळे आणि नोव्हेंबरपर्यंत सुरू असलेल्या अतिवृष्टीचा सामना केलेल्या कोकणातील वातावरण गेल्या आठवडाभरात पूर्णपणे बदलून गेले आहे. गुरूवारी ३६ अंशांपर्यंत तापमान वाढल्याने आधीच हैराण झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. त्यासाठी सतर्कतेच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.गेली काही वर्षे हवामानात खूप मोठा फरक पडत आहे. किनारपट्टी भागाला या बदलांचा खूप मोठा सामना करावा लागत आहे. गतवर्षात क्यार, फनी आणि माहा अशा तीन वादळांनी किनारपट्टीला दणका दिला. या वादळांमुळे रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्यक्षात खूप मोठे नुकसान झाले नसले तरी त्याचा वातावरणावर खूप मोठा परिणाम झाला. क्यार वादळामुळे पावसाने खूप मोठा धुमाकूळ घातला. त्यानंतर माहा वादळामुळेही वातावरणात मोठा बदल झाला.वातावरणातील या बदलांचा अनुभव गेली काही वर्षे सातत्याने येत असून, त्याचा आंबा, काजूच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्याशिवाय कोकणातील वातावरणातही मोठा बदल झाला आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडत होता. रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी ३५०० मिलिमीटर इतका पाऊस पडतो. यावर्षी तो ५००० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. जानेवारी महिन्यापर्यंत थंडीचा पत्ताच नव्हता. मधेमधे आलेल्या थंडीच्या लाटा वगळता जिल्ह्यात थंडीचा अनुभवच आला नाही.थंडीअभावी आंबा, काजूचा हंगाम पुढे गेला. जानेवारी महिन्यात तापमान कमी झाले. मात्र, अपवादात्मक दिवशीच ते १६-१७ अंशापर्यंत घसरले. अन्यवेळी ते अधिकच होते. अवघा दीड महिनाच पारा कमी होता. आता पारा अचानक उसळला असून, गुरूवारी रत्नागिरीमध्ये ३६ अंश इतके तापमान नोंदले गेले आहे.

येत्या चोवीस तासात दिवसभरात उष्णतेच्या लाटा उसळण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत तापमान अधिक असेल, उन्हाच्या झळा अधिक असतील, असा इशारा देण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात उन्हाळा सुरू होताना इतके तापमान असेल तर नजीकच्या काही दिवसात तयार होणारा आंबा करपून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :TemperatureतापमानRatnagiriरत्नागिरी