रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या अंजनी स्थानकावर नवीन लूप लाईन कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम दिनांक १ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याने सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत खेड ते चिपळूण स्थानकादरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.कोकण रेल्वे मार्गावरील अंजनी स्थानकावर नवीन लूप लाईनचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा सर्व वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. या कामादरम्यान मार्गावर असणाऱ्या गाड्या त्या - त्या स्थानकादरम्यान थांबविण्यात येणार आहेत.या दिवशी मडगाववरून सुटणारी मडगाव - मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस दुपारी १३.४५ वाजता म्हणजे १ तास ३० मिनिटाने उशिरा सुटणार आहे. तसेच या दरम्यान धावणाऱ्या १२६१९ मत्स्यगंधा एक्स्प्रेस, ५०१०३ दादर - रत्नागिरी पॅसेंजर, २२११३ एल टी टी कोचुवेली एक्स्प्रेस, ११००४ सावंतवाडी - दादर तुतारी एक्स्प्रेस तसेच १०११२ मडगाव - मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस या गाड्या स्थानकावर काही काळाकरता थांबवून ठेवण्यात येणार आहेत.
कोकण रेल्वे मार्गावर १ रोजी मेगाब्लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 17:46 IST
कोकण रेल्वेच्या अंजनी स्थानकावर नवीन लूप लाईन कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम दिनांक १ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याने सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत खेड ते चिपळूण स्थानकादरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर १ रोजी मेगाब्लॉक
ठळक मुद्देकोकण रेल्वे मार्गावर १ रोजी मेगाब्लॉकसायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत खेड ते चिपळूणदरम्यान वाहतूक बंद