शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील एलईडी मच्छीमारीबाबत लवकरच बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 17:33 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील विविध बंदरांमध्ये एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर कारवाई करण्यासाठी तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले.

ठळक मुद्देकाही मच्छीमार सोसायट्यांना मदत डिझेल परताव्याचे लवकरच मच्छीमारांना अनुदान एलईडीद्वारे मच्छीमारी कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी

रत्नागिरी : जिल्ह्यातील विविध बंदरांमध्ये एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर कारवाई करण्यासाठी तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले.रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात एलईडीद्वारे मासेमारी केली जात असल्याने पारंपरिक मच्छीमारांनी त्याबाबत कारवाईची मागणी केली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांच्या प्रश्नांसंदर्भात मुंबईत सोमवारी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य विकासमंत्री महादेव जानकर उपस्थित होते.रामदास कदम यांनी सांगितले की, एलईडीद्वारे मासेमारी करण्याचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील मासे नष्ट होत आहेत. अशा मच्छीमारीवर बंदी आणली नाही तर भविष्यात मासे मिळणार नाहीत. आपल्याला केरळ आणि कर्नाटक राज्यावर अवलंबून राहावे लागेल. तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या बोटी पकडण्यासाठी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने त्यांना कोस्टल अधिकाऱ्यांच्या ताब्यात द्यावे, अशी सूचना महादेव जानकर यांनी अधिकाऱ्यांना केली. या बैठकीला आमदार अशोक पाटील, आमदार भारती लव्हेकर तसेच मत्स्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.कृषी दर्जासाठी प्रयत्नमासेमारी करणाऱ्यांना शेतकऱ्यांसारखा कृषीचा दर्जा मिळण्यासाठी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. डिझेल परताव्याचे आतापर्यंत ४२ कोटी रुपये मच्छिमारांना दिले असून, आणखी २०० कोटी रुपयांची गरज आहे. त्यात ओखी वादळात नुकसान झालेल्या मच्छिमारांनाही मदत करायची असल्याचे सांगितले. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार