शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

रत्नागिरीत भेट झाली हो देवांची.. श्रीदेव भैरव - काशीविश्वेश्वर भेटीचा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 14:12 IST

रत्नागिरी शहरातील राजीवडा येथील श्री देव काशीविश्वेश्वर व मांडवी येथील श्रीदेव भैरवच्या पालखी भेटीचा डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी विश्वेश्वर मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

ठळक मुद्देरत्नागिरीत भेट झाली हो देवांची... श्रीदेव भैरव - काशीविश्वेश्वर भेटीचा सोहळा

रत्नागिरी : शहरातील राजीवडा येथील श्री देव काशीविश्वेश्वर व मांडवी येथील श्रीदेव भैरवच्या पालखी भेटीचा डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी विश्वेश्वर मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.श्रावणाच्या पहिल्या सोमवारी श्री देव काशीविश्वेश्वर मंदिर व मांडवी येथील श्रीदेव भैरव मंदिरामध्ये नामसप्ताहाला प्रारंभ होतो, तर श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी या सप्ताहाची समाप्ती होते. सप्ताहाच्या समाप्तीनंतर दोन्ही मंदिरांमध्ये पालख्यांमधून देवतांची मिरवणूक काढण्यात आली.

मांडवी येथील श्री देव भैरव राजीवडा येथे काशीविश्वेश्वराच्या भेटीला येतो. काशीविश्वेश्वराच्या नामसप्ताहाची सांगता सोमवारी दुपारी १२.३० वाजता झाल्यानंतर पालखी मंदिराबाहेर येते व मंदिराच्या आवाराबाहेरील घाटीवरुन पाच प्रदक्षिणा घालते. पालखीच्या तिसऱ्या प्रदक्षिणावेळी श्री भैरीच्या पालखी भेटीचा हा सोहळा रंगला.मांडवीतील भैरव देवाची पालखी मंदिरातून बाहेर पडल्यावर भडंगनाका, ८० फुटी हायवे नाका, बंदररोड, मुरलीधर मंदिर, काँग्रेसभवन, विठ्ठल मंदिर, धमालणीचा पार, गोखले नाका, मारुती आळीतील मंदिर, पुन्हा गोखले नाकामार्गे, राधाकृष्ण नाका, रामआळी, तेलीआळीमार्गे खडपेवठार येथून विश्वेश्वर घाटीवरुन आली. या घाटीमध्येच दोन्ही पालख्यांचे विणेकरी, मानकरी यांच्या भेटी झाल्यावर पालखी भेटीचा सोहळा रंगला. यावेळी भाविकांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली.यावेळी टाळ-मृदुंगांचा आवाज, ढोल-ताशांचा गजर व भजनामध्ये भाविक दंग झाले होते. सोमवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास पालखी भेटीचा हा सोहळा रंगला. पालखी भेट झाल्यानंतर दोन्ही पालख्यांच्या मानकऱ्यांनी श्रीफळ देऊन देवाची भेट घडवून आणली. यावेळी भक्तांची गर्दी अधिक होती.पालखी मंदिरातगाऱ्हाणे झाल्यावर श्री भैरवाची पालखी खडपेवठार, चवंडेवठार, विलणकरवाडी, घुडेवठार, दत्तमंदिरमार्गे मांडवी येथील मंदिरात गेल्यानंतर नामसप्ताहाची सांगता झाली. त्यानंतर दोन प्रदक्षिणा पूर्ण करत काशीविश्वेश्वराची पालखी मंदिरामध्ये विसावली.

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलRatnagiriरत्नागिरी