शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची आर्थिक कोंडी, ३ महिने वेतनाविना

By रहिम दलाल | Updated: February 12, 2024 14:14 IST

रहिम दलाल रत्नागिरी : जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांत दिवस-रात्र रुग्णांची सेवा करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना तीन महिन्यांचे मानधनच ...

रहिम दलालरत्नागिरी : जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांत दिवस-रात्र रुग्णांची सेवा करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना तीन महिन्यांचे मानधनच मिळालेले नाही. एकीकडे शासन आरोग्याच्या नवनवीन योजनांची घोषणा करणाऱ्या शासनाकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यासाठी जिल्हा परिषदेला अनुदानच आलेले नाही. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची आर्थिक काेंडी झालेली आहे.ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेची ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची १३३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ २५ वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून, १०८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे आराेग्य सेवेवर परिणाम होऊ नये म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रात बीएएमएस आणि एमबीबीएस अशा १०२ डॉक्टरांची तदर्थ वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.शासनाकडून अनुदान वेळेवर येत नसल्याने सर्वांत जास्त परिणाम तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वेतनावर झाला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वेतन वेळेवर मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेमध्ये फेऱ्या माराव्या लागत आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून शासनाकडे वेळोवेळी अनुदानाची मागणी करण्यात आलेली आहे. शासनाकडून अनुदानच आलेले नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेतन देणार कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात १०२ तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. त्यांचे तीन महिन्यांचे वेतन दिलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याबाबत शासनाला माहिती देण्यात आली आहे. शासनाकडून कंत्राटी चालकांसाठी अनुदान आले आहे; मात्र त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. - डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdoctorडॉक्टर