शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

मार्लेश्वर- गिरीजादेवीचा विवाहसोहळा मोजक्याच उपस्थितीत संपन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2022 18:59 IST

देवरूख : स्वयंभू श्री देव मार्लेश्वर व साखरप्याची गिरीजादेवी यांचा विवाहसोहळा (कल्याणविधी) मार्लेश्वर शिखरावर मानकरी व पुजारी यांच्या मोजक्याच ...

देवरूख : स्वयंभू श्री देव मार्लेश्वर व साखरप्याची गिरीजादेवी यांचा विवाहसोहळा (कल्याणविधी) मार्लेश्वर शिखरावर मानकरी व पुजारी यांच्या मोजक्याच उपस्थितीत आज, शुक्रवारी दुपारी २.४५ वाजताच्या मुहूर्तावर पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी हा विवाहसोहळा कोरोनाचे नियम पाळून साधेपणाने संपन्न झाला. सकाळी मार्लेश्वरची पालखी, गिरीजादेवीची पालखी व यजमान वाडेश्वराची पालखी या तिन्ही पालख्यांचे मार्लेश्वर तीर्थक्षेत्री मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत आगमन झाले. यानंतर धार्मिक कार्यक्रम पार पडले. विवाहसोहळ्याला दुपारी प्रत्यक्षात प्रारंभ होण्यापुर्वी परंपरेप्रमाणे तब्बल ३६० मानकऱ्यांना अगत्यपुर्वक निमंत्रण देण्यात आले. यानंतर मार्लेश्वर व गिरीजादेवीच्या विवाहसोहळ्याला लिंगायत धर्मिय शास्त्रानुसार पंचकलशाची मांडणी करून मंगलाष्टकांनी दुपारी २.४५ वाजताच्या शुभमुहूर्तावर पार पडला. या विवाहसोहळ्यासाठी भाविकांची गर्दी होवू नये किंवा कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, यासाठी मारळ फाटा व मार्लेश्वर तीर्थक्षेत्री देवरूख पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी