शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय सर्व कार्यालयांमध्ये मार्च एंडिंगची धावपळ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 15:12 IST

Government Ratnagiri-मार्चअखेर जवळ आल्याने शासकीय सर्व कार्यालयांमध्ये मार्च एंडिंगची धावपळ सुरू आहे. बिले खर्ची टाकण्यासाठी तसेच पगार मिळावेत, यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयात सध्या गर्दी होऊ लागली असून या कार्यालयात बिलांची संख्या वाढू लागली आहे.

ठळक मुद्देशासकीय सर्व कार्यालयांमध्ये मार्च एंडिंगची धावपळ सुरू निवडणुकीच्या बिलांची धांदल

रत्नागिरी : मार्चअखेर जवळ आल्याने शासकीय सर्व कार्यालयांमध्ये मार्च एंडिंगची धावपळ सुरू आहे. बिले खर्ची टाकण्यासाठी तसेच पगार मिळावेत, यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयात सध्या गर्दी होऊ लागली असून या कार्यालयात बिलांची संख्या वाढू लागली आहे.सध्या सर्वच कार्यालयांमध्ये मार्च एंडिंगची धावपळ सुरू आहे. त्यामुळे कामांचा निपटारा होण्यासाठी कर्मचाऱ्यांना सायंकाळी कार्यालयीन वेळेपेक्षा जास्त वेळ थांबावे लागत आहे. सर्व कामांची बिले तयार करून ती कोषागार कार्यालयाकडे पाठविण्याकामी सर्वच कर्मचारी यात अडकले आहेत. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालये सध्या गजबजलेली आहेत.जिल्हा कोषागार कार्यालयातही सध्या मार्च एंडिंगची धावपळ सुरू आहे. जिल्ह्यातील सुमारे २३५ कार्यालयांतील विविध बिले, कर्मचाऱ्यांची वैयक्तिक देयके, कार्यालयीन खर्च, वीज बिले, फोन बिल, सेवानिवृत्तांचे पगार आदी कामे या कार्यालयाकडून केली जातात. त्यामुळे या सर्व देयकांचा निपटारा करण्यात जिल्हा कोषागार कार्यालय गुंतले आहे.मार्च महिना सुरू होताच सर्वच कार्यालयांची वर्षाचा निधी खर्ची पडावा आणि त्याची बिले मिळावीत, यासाठी तारांबळ सुरू होते. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले, प्रवास भत्ते, स्टेशनरी बिले, पुढील वर्षासाठी खरेदी, शासकीय वाहनांवरील दुरुस्तीचा खर्च आदींची बिले कोषागार कार्यालयाकडे ३१ मार्चपूर्वी सादर करण्यासाठी ही सर्व कार्यालये धावपळ करत आहेत.नुकसान भरपाई वाटपाची धांदलजिल्ह्यात जून महिन्यात आलेले निसर्ग चक्रीवादळ तसेच पावसाळ्याच्या कालावधित निर्माण झालेली पूरपरिस्थिती यामुळे जिल्ह्याचे अतोनात नुकसान झाले आहे. भरपाईचा निधी शासनाकडून जिल्हा प्रशासनाकडे आला आहे.निवडणुकीच्या बिलांची धांदलजानेवारी महिन्यात ४७९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्याने आता मार्चअखेर निवडणुकीसाठी झालेल्या खर्चांची बिले करताना सर्व तहसील कार्यालयांच्या निवडणूक शाखेची दमछाक झाली आहे. निवडणूक कार्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्या मानधनाची बिले करतानाच दमछाक होऊ लागली असून इतर निधी खर्चाचीही बिले सादर करावी लागत असल्याने आता शेवटच्या टप्प्यात धांदल उडाली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी