शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : मराठा समाजाचे शुक्रवारी रत्नागिरीत आंदोलन, अत्यावश्यक सेवा वगळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 17:32 IST

मराठा समाज गेली दोन वर्षे आरक्षणासाठी आंदोलने करीत असून, शासनाकडून केवळ दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे आता येत्या शुक्रवारी, ३ रोजी आरक्षणासाठी तीव्र आंदोलन उभारून या दिवशी संपूर्ण जिल्हा बंद करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला.

ठळक मुद्देमराठा समाजाचे शुक्रवारी आंदोलन, अत्यावश्यक सेवा वगळणार जिल्हा बंदच्या नियोजन सभेत निर्धार

रत्नागिरी : मराठा समाज गेली दोन वर्षे आरक्षणासाठी आंदोलने करीत असून, शासनाकडून केवळ दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे आता येत्या शुक्रवारी, ३ रोजी आरक्षणासाठी तीव्र आंदोलन उभारून या दिवशी संपूर्ण जिल्हा बंद करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला.रत्नागिरीतील मराठा समाजानेही तीव्र आंदोलन उभारण्याची तयारी केली आहे. त्यादृष्टीने या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी तसेच नियोजन करण्यासाठी  येथील विवेक हॉटेलच्या मैदानावर मराठा समाजाची बैठक माजी खासदार नीलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

यावेळी व्यासपीठावर मराठा सकल समाजाच्या मंगला नलावडे, माजी उपनगराध्यक्ष संजू साळवी, सुधाकर सावंत, नित्यानंद दळवी, भाऊ देसाई, केशव इंदुलकर, संतोष तावडे, प्रताप सावंत-देसाई उपस्थित होते.या सभेत सुधाकर सावंत, प्रताप सावंत - देसाई यांनी मुख्यमंत्री आरक्षणाबाबत केवळ आश्वासनेच देत आले आहेत, त्यामुळे आता तीव्र आंदोलनाला पर्याय नसल्याचे मत व्यक्त केले. यासाठी समाजाने एकत्र यावे, असे आवाहन केले. मंगला नलावडे यांनी आंदोलन करणे काळाची गरज आहे. मात्र, जाळपोळ करून आंदोलनाला अर्र्थ येतो का, असा सवाल केला. आंदोलन करताना कोकणाला कोणताही डाग लागता कामा नये, याची काळजी घेऊया, असे मत व्यक्त केले.माजी खासदार नीलेश राणे यांनी समाज म्हणून सर्वांनी एकत्र येऊया, असे आवाहन केले. तसेच उत्स्फूर्त सहभाग असला की, आंदोलने आपोआप यशस्वी होतात, असे मत प्रदर्शित केले. या दिवशी जिल्हा बंद होणारच, त्यासाठी सर्व बाहेर पडणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच यादिवशी इतर सर्र्व व्यावसायिकांनीही बंद पाळून सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. मात्र, यात अत्यावश्यक सेवा वगळण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले गेले.तेव्हा कुठे होते लोकप्रतिनिधी ?काही दिवसांपुर्वी पाली येथील मराठा बांधवांनी आंदोलन केले होते. त्यावेळी काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. मात्र, त्यावेळी मराठा समाजाचे जिल्ह्यात चार आमदार असूनही तसेच लोकप्रतिनिधींपैकी कुणीही एकही केस होऊ देणार नाही, असे म्हटले नाही, अशी खंत पालीचे तात्या सावंतदेसाई यांनी व्यक्त केली. यावेळी निलेश राणे यांनी या आंदोलनात एकही गुन्हा दाखल होणार नाही, याची जबाबदारी मी घेईन, असे आश्वासन निलेश राणे यांनी दिले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणRatnagiriरत्नागिरी