शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra budget 2023: काजू बोर्डासाठीची तरतूद कोकणासाठी ठरेल तारणहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 16:28 IST

मच्छीमार, बागायतदारांसह सागरी महामार्गासाठीही तरतूद

रत्नागिरी : महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात कोकणातील बागायतदार, मच्छीमारांसाठी चांगली आर्थिक तरतूद करण्यात आली असून, अनेक वर्षे रखडलेल्या सागरी महामार्गासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रामध्ये काजूची लागवड आहे. या लागवडीतील लाखो टन काजू बोंडे केवळ फेकून दिली जातात. मात्र, आता त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सरकारने निधी मंजूर केला असल्याने त्यातून उत्पन्नाचा महामार्ग तयार होऊ शकतो.गेली काही वर्षे बेभरवशी हवामानामुळे आंबा व्यवसाय तोट्यात जात आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंब्यापेक्षा काजूची लागवड जवळजवळ दुप्पट आहे. मात्र, या लागवडीतील केवळ काजू बी वरच प्रक्रिया केली जाते. त्याची बोंडे वापरली जात नाहीत. त्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात आतापर्यंत अनेकदा बागायतदार, प्रक्रियादारांनी पुढाकार घेतला. मात्र, त्याच्या मंजुरीतील किचकट प्रक्रियेमुळे त्यात यश आले नाही. मात्र, आता त्यातून बागायतदार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडण्याची अपेक्षा आहे.

२०० कोटींची तरतूदआता राज्य सरकारने काजू बोर्डासाठी पहिल्या वर्षी २०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पाच वर्षांत १,३२५ कोटी रुपये त्यावर खर्च होणार आहेत. त्यामुळे त्यातून फुकट जाणाऱ्या काजू बोंडांना अच्छे दिन येण्याची अपेक्षा आहे. उत्पन्न वाढीसाठी कोकणातच प्रक्रिया केंद्र करण्याची तरतूदही अर्थसंकल्पात करण्यात आल्याने त्यातून बागायतदार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडण्याची अपेक्षा आहे.

रखडलेल्या सागरी महामार्गालाही आता गतीगेली अनेक वर्षे सागरी महामार्ग रखडला आहे. रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी असा हा सागरी महामार्ग आहे. बहुतांश ठिकाणी प्रत्यक्ष समुद्र किनाऱ्याला लागूनच हा महामार्ग जात असल्याने त्याचे काम पूर्ण झाल्यास त्यातून पर्यटन विकासाला मोठा हातभार लागेल. सद्य:स्थितीत अनेक ठिकाणी रस्ता अरुंद आहे आणि अनेक ठिकाणी मोठ्या खाड्यांवरील पुलाची कामेही झालेली नाहीत. या महामार्गासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे. तो आकडा जाहीर झाला नसला तरी अर्थसंकल्पात त्याचा समावेश झाल्याने त्याच्या मार्गातील अडथळे दूर झाले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBudgetअर्थसंकल्प 2023Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2023