शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

चिपळूणमध्ये स्वकीयांचा स्वकीयांशी रंगणार सामना, राजकीयदृष्ट्या संवेदनशील मतदारसंघात यंदा वैचारिक लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 18:12 IST

चिपळूण : मागील दोन विधानसभा निवडणुकी दोन विरोधी पक्षांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळाली होती. मात्र यावेळच्या निवडणुकीत स्वकीयांचा ...

चिपळूण : मागील दोन विधानसभा निवडणुकी दोन विरोधी पक्षांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळाली होती. मात्र यावेळच्या निवडणुकीत स्वकीयांचा स्वकीयांशीच सामना सुरु आहे. एकेकाळी राष्ट्रवादी व काँग्रेस अशा मित्रपक्षात कार्यरत असलेले कार्यकर्ते व पदाधिकारी या निवडणुकीच्या निमित्ताने आमने-सामने उभे राहिले आहेत. त्यात मित्र पक्षाची भूमिका तितकीच महत्त्वाची ठरणार असली तरी महायुतीचे उमेदवार आमदार शेखर निकममहाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्यातील सौम्य व वैचारिक स्वरूपाची लढाई प्रथमच चिपळूणकर अनुभवत आहेत.प्रत्येक निवडणुकीत चिपळूण राजकीयदृष्ट्या जिल्ह्यात अतिशय संवेदनशील मानले जाते. याआधी माजी आमदार रमेश कदम व आमदार भास्कर जाधव यांच्यातील राजकीय चढाओढीतून चिपळूण नेहमीच चर्चेत राहिले. त्यानंतर माजी आमदार सदानंद चव्हाण व आमदार शेखर निकम यांच्यातील लढत देखील राजकीयदृष्ट्या तितकीच अटीतटीची ठरली होती. मात्र आताची निवडणूक ही काँग्रेसच्या वैचारिक बैठकीत घडलेल्या आमदार शेखर निकम व प्रशांत यादव यांच्यात थेट लढत होत आहे.आमदार निकम आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार यादव हे दोन्ही समाजवादी विचारसरणीच्या मुशीत तयार झालेले नेतृत्व आहे. त्यामुळे सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असे उमेदवार आहेत. महायुतीचे निकम व महाविकास आघाडीचे यादव यांच्यातील ही लढत अजून तरी सौम्य व वैचारिक स्वरूपाची वाटत आहे. हे दोन्ही उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी विकास कामात कोण सरस हे दाखवण्याचे काम करत आहेत. आमदार शेखर निकम यांची ही तिसरी निवडणूक आहे, तर प्रशांत यादव हे प्रथमच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. तरीही निवडणुकीत रंगत अधिक आहे.

  • पाच वर्षातील विकास कामे हे शेखर निकम यांचे बलस्थान.
  • ‘वाशिष्ठी मिल्क’ च्या माध्यमातून शेतकऱ्यांशी असलेला संपर्क हे प्रशांत यादव यांचं बलस्थान.
  • शरद पवार यांचा पक्ष सोडणे हे शेखर निकम यांच्यासाठी तर विधानसभेतील नवखेपण प्रशांत यादव यांच्यासाठी परीक्षा पाहणारे आहे.

२०१९च्या निवडणुकीत मिळालेली मते

  • शेखर निकम राष्ट्रवादी - १,०१,५७८
  • सदानंद चव्हाण शिवसेना - ७१,६५४
  • सचिन मोहिते बसपा - २,३९२
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chiplun-acचिपळूणShekhar Nikamशेखर निकमMahavikas Aghadiमहाविकास आघाडीthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024