शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

हरवलेली वेदा तिच्या आईपर्यंत पोहोचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 14:32 IST

आईसोबत आठवडा बाजारात आलेली चार वर्षाची चिमुकली आईचा हात सुटल्यामुळे बाजारात हरवली. मात्र, दोन चाणाक्ष महिलांमुळे थोड्याचवेळात ती तिच्या आईपर्यंत पोहोचू शकली.

ठळक मुद्देहरवलेली वेदा तिच्या आईपर्यंत पोहोचलीआठवडा बाजारात हरवली होती मुलगी, आईचा हात सुटला

लांजा : आईसोबत आठवडा बाजारात आलेली चार वर्षाची चिमुकली आईचा हात सुटल्यामुळे बाजारात हरवली. मात्र, दोन चाणाक्ष महिलांमुळे थोड्याचवेळात ती तिच्या आईपर्यंत पोहोचू शकली.लांजातील आठवडा बाजाराला वेरवली बुद्रुक येथील तन्वी जयेश राहुल या आपली चार वर्षांची मुलगी वेदा हिला घेऊन आल्या होत्या. बाजाराच्या मध्य ठिकाणी आल्यानंतर दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास वेदाने आईचा हात सोडला आणि ती बाजूला गेली.

वस्तू खरेदी झाल्यानंतर तन्वी यांना वेदा दिसली नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला. मात्र वेदा न दिसल्यामुळे त्यांनी रडत रडतच पोलीस स्थानक गाठले. त्या रडत जाताना लांजा येथील रिक्षाचालक पप्पू शेलार यांनी पाहिले. रिक्षातील भाडे सोडताना त्यांनी दोन महिला एका छोट्या मुलीला नाव, गाव विचारताना पाहिले.

धनश्री भागवत ठणके (कुरूपवाडी) व शरयु विजय गाडे (राजयोग पार्क) या दोन महिला ओळखीच्या असल्याने पप्पू त्यांच्या मदतीला धावला. वेदाने आपले नाव सांगितले, मात्र तिने सांगितलेले गावाचे नाव चुकीचे होते. त्यामुळे सगळे हतबल झाले.ही मुलगी १० मिनिटांपूर्वी पोलीस स्थानकाकडे रडत गेलेल्या महिलेची असावी, असा अंदाज बांधून पप्पू शेलार, धनश्री ठणके व शरयु गाडे हे सर्वजण वेदाला घेऊन पोलीस स्थानकात आला. रिक्षातून वेदा बाहेर आल्यानंतर तिच्या आईने तिला घट्ट मिठी मारली व रडू लागली. धनश्री व शरयु या दोन महिलांच्या चाणाक्षपणामुळे मुलगी आणि आईची भेट झाली. लांजाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांनी त्यांचे अभिनंदन केले. तन्वी यांनी धनश्री व शरयु यांचे आभार मानले.

टॅग्स :PoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी