शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : मुसाड येथे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 16:09 IST

खेड तालुक्यातील मुसाड येथील घरात छपरावरून प्रवेश करून एक लाख रुपये रोख रकमेसह आठ तोळे सोन्याच्या दागिन्यांची धाडसी घरफोडी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमुसाड येथे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपासपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

खेड : तालुक्यातील मुसाड येथील घरात छपरावरून प्रवेश करून एक लाख रुपये रोख रकमेसह आठ तोळे सोन्याच्या दागिन्यांची धाडसी घरफोडी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुमारे तीन लाख रुपयांची ही घरफोडी असून चोरट्याला पकडण्यासाठी पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. खेड तालुक्यातील मुसाड येथील पोसनाक वाडीतील विकास तुकाराम पोसनाक यांच्या घरी शनिवारी मध्यरात्री ही घरफोडी झाली आहे. विशेष म्हणजे घरामध्ये विकास पोसनाक आणि त्यांचा मुलगा झोपला होता.हे दोघेही घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या छतावरील कौले काढून घरात प्रवेश केला आणि घरातील कपाटात असलेले रोख एक लाख रुपये तसेच एक मंगळसूत्र, दोन लहान सोन्याच्या चेन असा सुमारे दोन लाख १४ हजार रुपये किमतीचे आठ तोळे सोन्याचे दागिने एकूण असा तीन लाख रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.पहाटे विकास पोसनाक यांना जाग आल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. पोसनाक हे इलेक्ट्रिशियन असून त्यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. मुंबईला सामान खरेदी करण्यासाठी त्यांनी घरामध्ये एक लाख रुपये रोकड ठेवली होती.

चोरट्यांनी त्या रोख रकमेसह सुमारे आठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. घरात माणसे झोपली असतानादेखील झालेल्या या धाडसी घरफोडी मुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घरफोडीचा अधिक तपास खेडचे पोलिस निरीक्षक अनिल गंभीर, पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र्र धालवलकर, हवालदार नरेश चव्हाण करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी