शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

देवरुखनजीक विहीरीत पडलेल्या बिबट्याला सुखरुप काढले बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 19:59 IST

देवरुखनजीकच्या आंबवली गावातील गणपत सूर्याजी पाष्टे, (पाष्टे वाडी) यांच्या घराच्या आवारातील विहीरीत पडलेल्या बिबट्याला सोमवारी सकाळी वनविभागाने सुखरुप बाहेर काढले आहे.

ठळक मुद्देविहीरीत पडलेल्या बिबट्याला सुखरुप काढले बाहेर देवरुखनजीक आंबवली गावातील घटना, बिबट्याला नैसर्गिक अधिवासात

देवरुख- देवरुखनजीकच्या आंबवली गावातील गणपत सूर्याजी पाष्टे, (पाष्टे वाडी) यांच्या घराच्या आवारातील विहीरीत पडलेल्या बिबट्याला सोमवारी सकाळी वनविभागाने सुखरुप बाहेर काढले आहे.सोमवारी सकाळी ३.५ फूट उंचीचा दगडी कठडा असलेल्या विहिरीत बिबट्या पडलेची माहिती संतोष पाल्ये यांनी वनविभागाला दिली. यानंतर विभागाचे विभागीय वन अधिकारी र. शी. भवर यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड, देवरुखचे वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक न्हानू गावडे, शर्वरी कदम, लगेचच घटनास्थळी दाखल झाले.

मिलिंद डाफळे आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने ९.३० वाजता पिंजऱ्यात सुरक्षितरित्या बिबटयाला जेरबंद करण्यात आले. दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी देवरुख यांच्याकडून तपासणी करून सुरक्षितरित्या नर जातीच्या सुमारे ५वर्षे वाढीच्या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. हा बिबट्या सावज पकडण्याच्या नादात विहीरीत पडला असावा असा अंदाज वनविभागाकडुन वर्तविण्यात आला.

टॅग्स :leopardबिबट्याRatnagiriरत्नागिरी