शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

साखळोली येथे दुचाकीस्वारांवर बिबट्याचा हल्ला; २७ वर्षीय युवक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 22:29 IST

दापोली: असोंड गावच्या तरूणावर बिबटयाने हल्ला केला. यामध्ये तो थोडक्यात बचावला असून बिबटयाच्या नखांमुळे तरूणाला जखमा झाल्या आहेत. दापोली ...

दापोली: असोंड गावच्या तरूणावर बिबटयाने हल्ला केला. यामध्ये तो थोडक्यात बचावला असून बिबटयाच्या नखांमुळे तरूणाला जखमा झाल्या आहेत. दापोली येथून असोंडला जात असताना रात्री सव्वाआठच्या दरम्यान ही घटना घडली. वैभव खेडेकर (वय 27 ) असे जखमी तरूणाचे नावे आहे.

वैभव खेडेकर हा तरूण 7 ऑक्टोबरला दापोलीकडून दुचाकीवर मित्रासह गावी येत असताना साखळोली नं. 1 या गावचे ओम तेलोबा मंदिर परिसरात बिबटयाने हल्ला केला. दुचाकीवर मागे त्याचा मित्र अजय खेडेकर बसला होता. अजयच्या हातात मासळीची पिशवी होती. ओम तेलोबा मंदिर परिसरात आल्यावर रस्त्याशेजारी दबा धरून बसलेल्याय बिबटयाने दुचाकीवर उडी घेतली. मासळीची पिशवी बिबटयाने ओढून नेली.

यावेळी पंजा मारला तो वैभवच्या पायावर. त्यामुळे पायाला जखम झाली. वैभवने बिबटयाच्या हल्ल्यात न डगमगता हातातील दुचाकी सोडली नाही, तर त्याने भरधाव वेगाने शिवाजीनगर  येथील खासगी डॉक्टराकडे जाऊन उपचार करून घेतले. ही घटना समजताच वनविभागाच्या वन अधिकारी प्रकाश पाटील यांनी वैभवची भेट घेउन विचारपूस केली. त्याचप्रमाणे ज्या परिसरात घटना घडली त्या परिसरात गस्त चालू केली. बिबटयापासून बचावासाठी परिसरात  सूचना फलक लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संध्याकाळी पावणेसातच्या दरम्यान मंगेश घडवले (वय 35) याच्यावरही बिबटयाने याच परिसरात हल्ला केला. पण तोच बचावला. त्याच्या दुचाकीच्या नंबर प्लेटखाली बिबटयाची नखे लागली आहेत. गेल्यावर्षा याच रस्त्यावर 3 ते 4 जणांवर बिबटयाने हल्ला केला होता. गेले वर्षभर बिबटया कोणालाही दिसला नाही. त्यामुळे तो या परिसरातून दुसरीकडे निघून गेल्याची चर्चा होती. मात्र आता परत बिबटयाने हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी