शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जेएनयु प्रकरणामुळे डाव्यांचा दहशतवादी चेहरा समोर : माधव भंडारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 17:23 IST

दिल्ली येथील जेएनयु विद्यार्थी मारहाण प्रकरणामुळे डाव्यांचा दहशतवादी चेहरासमोर आला असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला आहे. डाव्यांनीच हे दहशतवादी कृत्य केले आहे, या प्रकरणाशी भाजपचा कोणताही हात नाही, असे विधान भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले. दापोलीत राष्ट्रप्रेमी संघटनेच्यावतीने नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन देण्यासाठी माधव भंडारी यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी दिल्लीतील मारहाणीप्रकरणी भूमिका मांडली.

ठळक मुद्दे डाव्यांचा दहशतवादी चेहरा समोर : माधव भंडारी दिल्लीतील विद्यार्थी मारहाणप्रकरणी जोरदार टीका

दापोली : दिल्ली येथील जेएनयु विद्यार्थी मारहाण प्रकरणामुळे डाव्यांचा दहशतवादी चेहरासमोर आला असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला आहे. डाव्यांनीच हे दहशतवादी कृत्य केले आहे, या प्रकरणाशी भाजपचा कोणताही हात नाही, असे विधान भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले.

दापोलीत राष्ट्रप्रेमी संघटनेच्यावतीने नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन देण्यासाठी माधव भंडारी यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी दिल्लीतील मारहाणीप्रकरणी भूमिका मांडली.दिल्ली येथील जेएनयु प्रकरणात भाजपच्या विद्यार्थी संघटनेचा कोणताही हात नसून, यामागे डाव्या पक्षांचा हात आहे. प्रकरणातून डाव्या विद्यार्थी संघटनांनी दहशतवादी कृत्य केले आहे, डाव्या संघटनांना देशामध्ये दहशत आणि रक्तपात घडवून आणायचं आहे. त्यामुळेच अशा प्रकारचे दहशतवादी कृत्य देशातील विविध भागात केले जात आहे. डाव्या संघटनांचा हा चेहरा जनतेसमोर आला आहे. त्यांचे हे कृत्य मानवतेला काळिमा फासणारे आहे, या कृत्याचे आपण समर्थन करणार नाही, केंद्रामध्ये भाजपचे सरकार आहे, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोरात कठोर शासन होईल, असे त्यांनी सांगितले.

जेएनयु प्रकरणात हस्तक्षेप केला असता तर विरोधकांनी आमच्यावर टीका केली असती, आता या प्रकरणात अनेक विद्यार्थ्यांना मारहाण झाली असून, बुरखाधारी लोकांनी मारहाण केली आहे. त्यामुळे हल्लेखोर कोण होते हे कळू शकले नसले नाही. परंतु लवकरच त्यांचा चेहरा समोर येईल व त्यांना कठोर शासन होईल, असेही माधव भंडारी म्हणाले.नागरिकत्व सुधारणा कायद्याला देशात सर्वत्र विरोध होत असताना भाजपकडून नागरिकत्व सुधारणा कायदा कसा योग्य आहे, याबद्दल ठिकाणी सभा घेऊन जनतेला समजून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. माधव भंडारी यांनी सीएए, एनआरसी यावर प्रबोधन केले. माधव भंडारी यांच्या जाहीर सभेला दापोली तालुक्यातील सर्वच जाती, धर्मातील लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता.शंकांचे निरसन नाहीचएनआरसी व एसएससी कायदा काय आहे, याचे फायदे काय आहेत, याबद्दल माधव भंडारी यांनी लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मुस्लिम बांधवांनी सीएए व एनआरसी याबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या. मात्र, त्यांच्या शंकांचे निरसन करता आले नाही. 

टॅग्स :jnu attackजेएनयूBJPभाजपाRatnagiriरत्नागिरी