शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
3
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
4
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
5
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
6
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
7
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
8
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
9
Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
10
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
11
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
12
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
13
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
14
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
15
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
16
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
17
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
18
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
19
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
20
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

रात्री उशिरापर्यंत गणेशमूर्तींचे विसर्जन खेड तालुका : विसर्जनस्थळी नगरपालिकेकडून रोषणाई

By admin | Updated: September 16, 2016 23:48 IST

सावर्डेत चैतन्य सोहळ्याची सांगता-- चिपळुणात गणरायाचे विसर्जन --गणपतीपुळे परिसरात बाप्पाला निरोप

मंडणगडात गणेशोत्सवाची सांगता लांजात वाजत - गाजत विसर्जनसंगमेश्वर तालुक्यात भावपूर्ण निरोपदापोलीत पारंपरिक पद्धतीने मूर्तींना निरोपनऊ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन$$्निराजापूर तालुका : पोलीस बॉईज गणपतीचे अनंत चतुर्दशीनंतर विसर्जनखेड : खेड शहर व तालुक्यातील १४ सार्वजनिक आणि घरगुती १९९७ गणेशमूर्तींचे अनंत चतुर्दशीला जगबुडी नदीत शांततेत विसर्जन करण्यात आले.़ यावेळी निघालेल्या मिरवणुकांमधील भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. शिवसेना आणि मनसेतर्फे आयोजित सार्वजनिक उत्सव गणेशमूर्तींचे विजर्सन केल्यानंतर रात्री १२ वाजण्याच्या सुमारास खोंडे (जोगळेकरवाडी)तील गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. खेड नगरपालिकेच्यावतीने विसर्जनस्थळी विद्युत रोषणाई करण्यात आली होती़ पोलिसांनीदेखील चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरातील शिवसेनेच्या सार्वजनिक गणेशोत्सवासह मनसेचा सार्वजनिक गणेशोत्सव, वडार समाज सार्वजनिक गणेशोत्सव, महात्मा फुलेनगर - खेड, नातूवाडी प्रकल्प वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव - भरणे, महाराष्ट्र बेलदार समाज सार्वजनिक गणेशोत्सव - भरणे, वडार समाज संघटना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - दस्तुरी, वडार समाज युवक मंडळ - भरणे पुरस्कृत जयगणेश मित्रमंडळ गणेशोत्सव, संघर्ष मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - भरणेनाका, सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ - आंबवली, गणेश मित्रमंडळ - कळंबणी बुद्रुक, जयहिंद गणेश मित्रमंडळ - घाणेकुंट, एमआयडीसी गणेश उत्सव मित्रमंडळ - पीरलोटे, अग्निशामक कर्मचारी गणेश मित्रमंडळ - लोटे, मुरली मनोहर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गुजरआळी, खेड, एस्. टी़ आगार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - खेड, बंजारा समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - वेरळ, आदींसह खेड तालुक्यातील १४ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. विशेष म्हणजे न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करीत आणि पोलिसांच्या सूचनेचे पालन करीत या मंडळांनी अत्यंत शांततेत विसर्जन केले़ यावेळी ख्ोड नगरपालिकेच्या सुरक्षा पथकांसह जगबुडी नदीकिनारी होड्या आणि पाणबुडी कर्मचारी यांची व्यवस्था करण्यात आली होती़ खेडच्या नगराध्यक्षा उर्मिला शेट्ये- पाटणे व मुख्याधिकारी महादेव रोडगे हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते़ खेड शहरातील खासगी गणपती दुपारी ४ वाजल्यापासूनच विसर्जनासाठी बाहेर पडले होते़ तर शिवसेना आणि मनसेच्या गणपती मिरवणुकीला ६ वाजल्यापासून प्रारंभ केला. विसर्जनस्थळी आलेल्या गणरायांवर बिपीन पाटणे यांनी पुष्पवृष्टी केली. (प्रतिनिधी)