शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षात घरोघरी पाईपने गॅस पुरवठा, रत्नागिरी ठरणार देशातील पहिला जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 13:48 IST

येत्या तीन वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यातील घराघरांमध्ये पाईपद्वारे स्वयंपाक गॅसचा पुरवठा केला जाणार आहे. एलपीजी गॅसपेक्षा स्वस्त हा प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच रत्नागिरीकरांना आता गॅस पाईपलाईनने गॅसचा पुरवठा केला जाणार असून, रत्नागिरी देशातील पहिला जिल्हा ठरणार आहे. पुढील तीन वर्षात हे काम पूर्ण होईल. 

ठळक मुद्देतीन वर्षात घरोघरी पाईपने गॅस पुरवठारत्नागिरी ठरणार देशातील पहिला जिल्हारत्नागिरी गॅस प्रकल्पालाही गॅस पुरवठा होणार

रत्नागिरी : येत्या तीन वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यातील घराघरांमध्ये पाईपद्वारे स्वयंपाक गॅसचा पुरवठा केला जाणार आहे. एलपीजी गॅसपेक्षा स्वस्त हा प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच रत्नागिरीकरांना आता गॅस पाईपलाईनने गॅसचा पुरवठा केला जाणार असून, रत्नागिरी देशातील पहिला जिल्हा ठरणार आहे. पुढील तीन वर्षात हे काम पूर्ण होईल. 

रत्नागिरी जिल्ह्यातील घरोघरी, वाहने व उद्योगांना इंधन म्हणून गॅस पुरवठा करण्यासाठी आवश्यक स्टोेरेज स्टेशन्स कंपनीतर्फे उभारली जाणार आहेत. घरांमध्ये दिला जाणारा हा गॅस एलपीजी गॅसपेक्षा स्वस्त मिळणार आहे. तसेच या गॅसच्या वापरामुळे स्वच्छ इंधन (क्लीन फ्युएल) उपलब्ध होणार असून, अन्य इंधनाप्रमाणे प्रदूषणाचा धोका उरणार नाही.

रत्नागिरी तालुक्यातील जयगड बंदरामध्ये हिरानंदानी गु्रपतर्फे फ्लोटिंग स्टोरेज रिगॅसिफिकेशन युनिटवर आधारित एलएनजी टर्मिनल सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून येत्या तीन वर्षांत जिल्ह्यातील घराघरांमध्ये पाईपद्वारे स्वयंपाक गॅसचा पुरवठा केला जाणार आहे. देशातील केवळ महानगरांमध्येच उपलब्ध असलेली ही सुविधा येथे उपलब्ध झाल्यास रत्नागिरी हा अशी सुविधा मिळविणारा देशातील पहिला जिल्हा ठरू शकेल.देशातील पहिल्या फ्लोटिंग स्टोरेज रिगॅसिफिकेशन युनिटवर आधारित एलएनजी टर्मिनलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. या प्रकल्पाद्वारे थेट पाईप लाईनमधून दाभोळच्या रत्नागिरी पॉवर प्रोजेक्टला ३६५ दिवस गॅसचा पुरवठा केला जाणार आहे. गॅसच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरी पॉवर प्रोजेक्ट वर्षातून केवळ ६ महिनेच कार्यरत आहे. एच एनर्जीच्या टर्मिनलमधून पाईपद्वारे गॅसचा पुरवठा झाल्यानंतर दाभोळच्या रत्नागिरी पॉवर प्रोजेक्टमधून वर्षभर वीजनिर्मिती शक्य होणार आहे. 

टॅग्स :Ratnagiri Gasरत्नागिरी गॅसRatnagiriरत्नागिरी