लांजा : शुक्रवार व शनिवारी या दोन दिवसांमध्ये लांजा शहरात तीन, तर निवसर येथे एक असे एकूण चार कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. लांजा तालुक्यात दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत लागल्याने तालुक्यातील जनतेची चिंता वाढली आहे.
शुक्रवारी शहरातील धावणेवाडी येथील १६ वर्षीय युवकाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यानंतर शनिवारी शहरातील माऊली नगर येथील ४० वर्षीय व २३ वर्षीय तरुणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. तसेच निवसर येथील ५० वर्षीय महिलेचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. दोन दिवसांमध्ये कोरोनाचे चार रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली आहे. तालुक्यात एकूण ५५१ रुग्ण आढळून आले होते. त्यामधून ५२३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या कोरोनाचे एकूण १३ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. १५ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.