शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेक निकामी झाल्याने लांजा-रत्नागिरी बसला अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

By अरुण आडिवरेकर | Updated: October 18, 2022 13:15 IST

याच दरम्यान शाळा सुटली होती. मात्र, चालकाने वेळीच प्रसंगावधान राखून गाडी बाजूला नेल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

पावस : लांजा येथून सुटलेल्या एसटी बसला पावस येथील उतारात ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या दरम्यान झाला. या रस्त्याच्या कडेलाच लागून दोन घरे असून, सुदैवाने गाडी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका झाडावर अडकून राहिल्याने मोठी घटना घडली.लांजा - रत्नागिरी (एमएच ४०, एन ९८४१) ही गाडी लांजा आगारातून सात विद्यार्थ्यांसह ९ प्रवाशांना घेऊन सकाळी १०.३० वाजता सुटली. धोपटवाडी येथील शाळेची सात मुले दुपारच्या सत्रासाठी पावस शाळेत येत होती. ही गाडी देवधे मार्गे पावस येथे येत असताना पावस येथील उतारात हा अपघात झाला. एसटी बसच्या समोर दोन रिक्षा आणि एक डंपर जात होता. या वाहनांना वाचविण्यासाठी बस चालकाने ब्रेक मारला. मात्र, त्याचक्षणी निकामी झाल्याचे लक्षात आले.चालकाने प्रसंगावधान राखून गाडी रस्त्याच्या कडेला एका बांधाच्या सहाय्याने थांबविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी गाडी कलंडली आणि रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका झाडावर अडकले. या रस्त्याच्या कडेलाच दोन घरे असून, या घरांवर ही गाडी कोसळता कोसळता वाचली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.याच दरम्यान शाळा सुटली होती. मात्र, चालकाने वेळीच प्रसंगावधान राखून गाडी बाजूला नेल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. या अपघाताची माहिती मिळताच पूर्णगड पोलीस स्थानकाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्यासह एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात