शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प

By संदीप बांद्रे | Updated: July 19, 2023 16:05 IST

सध्या वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. बाजारपेठेतील नाथ पै चौक, चिंचनाका, मच्छी मार्केट, पेठमाप, भेंडीनाका, वडनाका, मुरादपूर येथील काही ठिकाणी पुराचे पाणी शिरले आहे.

चिपळूण : कोकणात पावसाचं थैमान सुरू आहे. अशात मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाच्या परशुराम घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे. यामुळे काही वेळासाठी घाटातील थांबविण्यात आली आहे. परिणामी महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. शिवाय पावसाचा जोर कायम शहर हद्दीत पाणी पातळीही वाढत आहे.

महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरण केल्यानंतर दरडीचा धोका वाढला आहे. आतातपर्यंत तीन वेळा दरड कोसळली. अशातच बुधवारी चिपळूण परिसरात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळली. आधी कुंभार्ली घाटात दरड कोसळली, त्यापाठोपाठ परशुराम घाटात दरड कोसळल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. या घटनेमुळे घाटातील वाहतूक दरड बाजूला करे पर्यंत थांबविण्यात आली आहे. अजूनही रस्त्यावर आलेले दगड व माती हटविण्याचे काम चालू आहे.  सध्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद केल्यानंतर दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली आहे. 

सध्या वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. बाजारपेठेतील नाथ पै चौक, चिंचनाका, मच्छी मार्केट, पेठमाप, भेंडीनाका, वडनाका, मुरादपूर येथील काही ठिकाणी पुराचे पाणी शिरले आहे. नगर परिषदेच्या बोटी सांस्कृतिक केंद्र, शंकरवाडी, बाजारपेठ विसर्जन घाट, बस स्थानक, नगर परिषद कार्यालय या ५ ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. नगर परिषदेची  ९ पथके, तर एनडीआरएफची पथके ६ ठिकाणी तैनात केलेली आहेत. एका पथकात ५ तलाठी, ३ पोलीस व ३ जवान आहेत. या पथकासोबत एकूण ४ बोटी आहेत.

कुंभार्ली घाटातील दरड हटविण्यात आली असून आता दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू आहे. तालुक्यातील मिरजोळी जुवाड बेट येथील १९ कुटुंबातील ६५ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आलेले आहे. ते सर्वजण आपल्या नातेवाईकांच्या घरी स्थलांतरीत झाले आहेत. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने चिपळूण तालुक्यांतील शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे.

टॅग्स :Chiplunचिपळुणchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाRainपाऊस