शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

राजकीय अनास्था अन् नियोजनाचा अभाव

By admin | Updated: February 6, 2015 00:46 IST

संगमेश्वर तालुका : धरणे असूनही पाणीटंचाईचा कडाका कायम...

सचिन मोहिते - देवरुख -सह्याद्रीच्या पर्वतरांगांत, डोंगरदऱ्यांत आणि मैदानी भागात असा विस्तार असलेला संगमेश्वर तालुका भौगोलिकदृष्ट्या खूपच मोठा तालुका आहे. उन्हाळ्याच्या हंगामात डोंगराळ भागात वसलेल्या गावांमध्ये दरवर्षी पाणीटंचाईची समस्या उभी ठाकलेलीच असते, तर या ठिकाणी पाण्याच्या पातळीत घट होत असल्याने, पाण्याचे स्रोत आटत जातात आणि पाणी टंचाईची समस्या दरवर्षी भेडसावत राहते. तालुक्यात सोनवी, शास्त्री- बावनदी, गडगडी नदी सारख्या मोठ्या नद्यांबरोबरच गडगडी धरण, गडनदी धरण, मोर्डे, रांगव, कोंडगाव, कडवई आणि निवे सारखी मोठी धरणे याचबरोबर पाझर तलाव असतानादेखील ‘धरणं उशाला आणि कोरड घशाला’ अशीच काहीशी स्थिती संगमेश्वर तालुक्याची आहे. पाणीटंचाईची ही परिस्थिती उद्भवत असताना कोणत्याही स्वरूपाची उपाययोजना करण्याची मानसिकताच नसल्याचेही दिसून सयेत आहे. राजकीय अनास्था आणि नियोजनाचा अभाव; तसेच गावांतील दुफळी यामुळेच तीस वर्षांपासून तयार होत असलेली धरणे पाणी व्यवस्थापनाच्या प्रतिक्षेत आहेत, असे म्हणावे लागेल. हा प्रश्न केव्हा मार्गी लागणार, हे नियोजन आणि अंमलबजावणी याचबरोबरच जनतेच्या एकोप्यावरच अवलंबून राहणार आहे. पाणीटंचाईच्याविरोधात जनमताचा एकोपा नसल्याने या प्रश्नाकडे राजकीय पुढाऱ्यांचेही म्हणावे तसे लक्ष नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे हा प्रश्न तसाच रेंगाळत पडला आहे. अलिकडे पाणलोट विकास योजनेसारख्या उपक्रमामध्ये पाणी अडवून पाणी जिरवण्याची प्रक्रिया चालूच आहे. तालुक्यात दरवर्षी सर्वसाधारण पुरेसा पाऊस पडत आहे. आणि याचाच विचार करून वाशी येथील गडनदीधरण प्रकल्प, मोर्डे, रांगा, कोंडगाव, कडवई, निवे आणि गडनदी अशी धरणे उभारण्यात आली आहेत. धरणांची कामे शेवटच्या टप्प्यात आहेत. मात्र, अद्यापही कालव्यांतून पाणी सोडण्यात आलेले नाही. ज्या गावांत पाणी टंचाई आहे. त्याठिकाणी कालव्यांच्या माध्यमातून पाण्याचे काही व्यवस्थापन करता येते का?, याबाबत काहीच नियोजन नसल्याचे दिसत आहे. दुसऱ्या बाजूला पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जीवन प्राधिकरण विभागापासून ग्रामीण पाणीपुरवठा, भारत निर्माण योजना, शिवकालीन पाणीपुरवठा योजना, विंधन विहिरी आदी योजना राबवल्या जात असताना गावातील काही पुढारी, अल्पसंतुष्ट नागरिकांमुळे आणि अधिकाऱ्यांच्या निष्काळजी पाणी आणि कुरण म्हणून बघण्याच्या विषयामुळे काही ठिकाणच्या योजना बारगळण्याच्या स्थितीत अथवा वर्षानुवर्षे अर्धवट स्थितीत असल्याचेच दिसत आहे.गेल्या सात-आठ वर्षांत टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी होताना दिसत आहे. तरीदेखील गेल्या पाच वर्षांत २९ गावांतील ६२ वाड्यांना पाणी टंचाईची झळ पोहोचताना दिसत आहे. यावर्षीदेखील २९ गावांतील ६२ वाड्यांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल ७ लाख ४४ हजार रूपयांचा टंचाईग्रस्त आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. तर पाणी टंचाई प्रतिबंधात्मक भूजल पुर्नभरण प्रक्रियेसाठी तब्बल ७३ लाखांचा आराखडा यावर्षी तयार झाला असून, यातच प्रतिबंधात्मक कृती आराखडा म्हणून विहिर वृध्दीकरणासाठी, पाझर तलावासाठी आणि पक्के बंधारे याकरितादेखील तब्बल ७८ लाखांचा समावेश करण्यात आला आहे. यावर्षी टंचाईग्रस्त आराखड्यात असलेल्या २९ गावातील ६२ वाड्यांमध्ये टंचाई आहे. टंचाईग्रस्त गावातील टंचाई दूर करण्यासाठी यावर्षी १६ नळपाणी पुरवठा योजनेला मंजुरी, तर चार विहिरींना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे मंजुरी देण्यात आली आहे. टंचाईवरील उपायांसाठी ७३ लाखांची कामे सुचवण्यात आलेली असून, त्यामध्ये साखरपा येथे पाझर तलाव, गोवरेवाडी खोरी येथे, डिंगणी येथे बौध्दवाडीमध्ये भूमिगतबंधारा, भडकंबा येथील गडनदीवर पक्का बंधारा, दाभोळे येथे बेलवकरवाडी न. पा. फ. विहिरीला गॅलरी बांधणे, पुर्ये ता. सावर्डे- ब्राम्हणवाडी येथे बंधारा बांधणे, पिरंदरवणे होवडेवाडी येथे पत्रावर बंधारा, कुरधुंडा बौध्दवाडी येथे बंधारा तसेच निवे खुर्द येथे माईनवाडी परबवाडी विहिरीजवळ बंधारा या कामाकरीता अंदाजित रक्कम ७३ लाख सुचविण्यात आली आहे.टंचाई प्रतिबंधात्मक कृती आराखड्यांतर्गत एका गावात विहीर वृध्दीकरणासाठी १० लाख, एका पाझर तलावासाठी १० लाख रुपये, पाच गावांमध्ये ६ पक्के बंधारे बांधण्यासाठी ५८ लाख अशी एकूण ७८ लाखांची कामे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. संगमेश्वर तालुक्यात वीज बिल न भरल्याने योजनेचा वीजपुरवठा खंडित झाला, असे एकही उदाहरण या तालुक्यात नाही. उलट पक्षी पाण्याचा स्रोत आटल्यानेच उन्हाळ्यात पाणीपुरवठा बंद होतो.दरवर्षी पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो. या लाखो रुपयांचा टंचाई आराखडा बनवण्यात येत असला, तरीदेखील यावर्षी आठ धनगरवाड्या आणि ११ बौध्दवाड्या तहानलेल्याच आहेत.संगमेश्वर येथे चालू वर्षासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने १६ नळपाणी योजनाना मंजुरी तर चार विहिरींना मंजूरी दिली आहे. तसेच एक पाझर तलाव, सहा पक्के बंधारे आणि एक विहिरीकरीता एकूण ७८ लाख अंदाजित रक्कमेची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत, अशी माहिती मिळाली आहे.संगमेश्वर नदी काठावरच वसलेले असल्याने नावडी ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींमध्ये मुबलक पाण्याचा साठा आहे. नावडीची लोकसंख्या सुमारे साडे तीन हजाराच्या घरात असून, नावडी ते रामपेठ अशा १२ वाड्यांचा समावेश आहे. या वाड्यांना नळपाणी योजनेच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा केला जातो. देवरुख शहरालानगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाला. या शहराची लोकसंख्या सुमारे १८ हजार इतकी असून २१ वाड्यांचा समावेश आहे. देवरुखला धावडेवाडी, परशुरामवाडी येथून नळपाणी योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. यापूर्वी तीन वर्षांपूर्वी उन्हाळ्यात शेवटच्या टप्प्यात काही अंशी टंचाई निर्माण होत होती. मात्र, अडीच वर्षांपूर्वी गाळ उपसा करण्यात आला. नंतर सध्या पाण्याचा साठा मुबलक आहे. देवरुख शहरांतील २१ वाड्यांना एक तास या नुसार पाणीपुरवठा केला जातो. सध्या देवरुख नगरपंचायतीने एक पाऊल पुढे उचलले असून, २४ बाय ७ असे २४ तास पाणी मीटर पध्दतीने देण्याची योजना सध्या प्रस्तावित करण्यात येत आहे.