शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील सिव्हीलच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा, रक्तपुरवठा करताना अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 16:57 IST

रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गरोदर महिला, बालके, डायलेसीस शस्त्रक्रिया, अपघाती रूग्ण यांना रक्तपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. यासाठी सध्या रक्तदात्यांच्या सहकार्याची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीतील सिव्हीलच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा, रक्तपुरवठा करताना अडचणसंकटाच्या वेळी रक्तदात्यांच्या सहकार्यची नितांत गरज

रत्नागिरी : येथील शासकीय जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गरोदर महिला, बालके, डायलेसीस शस्त्रक्रिया, अपघाती रूग्ण यांना रक्तपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. यासाठी सध्या रक्तदात्यांच्या सहकार्याची गरज निर्माण झाली आहे.जिल्हा शासकीय रूग्णालयात विविध आजारांचे रूग्ण तसेच वाढत्या अपघातांच्या संख्येमुळे दरदिवशी सरासरी २० ते २५ रक्तपिशव्यांचा पुरवठा करावा लागतो. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत दाखल असणाऱ्या रुग्णांना (विशेषत: हृदयशस्त्रक्रिया, डायलेसीस) नि:शुल्क रक्तपुरवठा करण्यात येतो.रक्ताची वाढती गरज लक्षात घेता यासाठी शिबिरांच्या तसेच ऐच्छिक रक्तदानाच्या माध्यमातून रक्तसंकलित करावे लागते. एप्रिल ते जून या कालावधीत सुट्यांचा कालावधी असला तरी याच कालावधीत विविध साथीच्या आजारांच्या रूग्णांबरोबरच अपघातांची संख्या वाढत असल्याने जिल्हा रूग्णालयाला रक्त कमी पडत असल्याचे चित्र निर्माण होते. मात्र, या रक्तपेढीची टीम आवश्यक असेल तेव्हा शिबिराचे आयोजन करून रक्तदात्यांना आवाहन करते. वार्षिक २००० पिशव्या इतके रक्तसंकलन करणारी जिल्हा रूग्णालयाची रक्तपेढी आता वार्षिक ६००० पिशव्या इतके रक्तसंकलन व तितकाच रक्तपुरवठा करीत आहे.सध्या या रूग्णालयात विविध आजारांची रूग्णसंख्या वाढू लागली आहे. तसेच प्रसुती, डायलेसीस रूग्ण, विविध शस्त्रक्रिया व इतर आजारांचे रूग्ण वाढल्याने या रक्तपेढीला रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. विविध रक्तगटांच्या केवळ १३ पिशव्या सध्या शिल्लक आहेत. गरोदर माता, बालके, डालेसीस शस्त्रक्रिया, अपघाती रूग्ण यांना रक्त पुरवठ्यात अडचणी येत आहेत. ओ पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, एबी पॉझिटिव्ह या गटांचे रक्त उपलब्ध नाही.यावेळी जाणीव पुढेया रक्तपेढीच्या सहाय्यासाठी सदैव धावून येणारी रत्नागिरीतील जाणीव फाऊंडेशन ही संस्था यावेळीही पुढे आली आहे. लवकरच चवे, जाकादेवी आणि रत्नागिरी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.कोणते गट नाहीतसध्या रक्तपेढीकडे बी पॉझिटिव्ह, ओ पॉझिटिव्ह, एबी पॉझिटिव्ह या गटांचा रक्तसाठा शिल्लक नाही. रक्तपेढीतर्फे दोन ठिकाणी शिबिर घेऊन ३५ बॅगांचे रक्त संकलित करण्यात आले होते. मात्र, त्यापैकी २२ बॅगा संपल्याने आता १३ बॅग्ज शिल्लक आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य