शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: रत्नागिरी जिल्ह्यात कुणबी मराठा नोंदी मिळाल्या, नेमक्या किती...जाणून घ्या 

By शोभना कांबळे | Updated: November 8, 2023 18:02 IST

सध्या गाव नमूना १४ मधील जन्म - मृत्यूच्या नोंदीत नाव आणि जातींची तपासणी केली जात आहे.

रत्नागिरी : जिल्ह्यातील ८ तालुक्यांमधील १३०४ तपासणी गावांच्या संख्येत काल, मंगळवार अखेर केलेल्या रजिस्टर तपासणीमध्ये ६९ कुणबी मराठा नोंदी मिळाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली आहे.मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्याबाबत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर अधिक गती आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातून कुणबी मराठा नोंदी मागविण्यात आल्या आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा पातळीवर वेगाने काम सुरू झाले आहे. त्यासाठी महसूल अभिलेखातील नोंदी तपासल्या जात आहेत. सध्या गाव नमूना १४ मधील जन्म - मृत्यूच्या नोंदीत नाव आणि जातींची तपासणी केली जात आहे.जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांची बैठक घेऊन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी याबाबत सुचना दिल्या आहेत. त्यानुसार तालुकास्तरावर हे काम जोरात सुरू आहे. आतापर्यंत ८ जिल्ह्यातील १३०४ गावांमधील महसूल अभिलेखांची तपासणी सुरू आहे. आतापर्यंत १३०४ गावांमधील सुमारे २० हजार पेक्षा अधिक नोंदी तपासण्यात आल्या आहेत. यात १९१० सालानंतरचे अभिलेख तपासले जात आहेत.मंगळवारअखेर १३०४ गावांमधील महसुली अभिलेखात ६९ कुणबी मराठा नोंदी सापडल्या असल्याचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी सांगितले आहे.राजापूर, चिपळूणमध्ये सर्वाधिक नोंदी मंगळवारपर्यंत तपासलेल्या दस्तएेवजात सर्वाधिक राजापुरात सर्वाधिक कुणबी मराठा नोंदी २८ तर त्याखालोखाल चिपळूण तालुक्यात २२ नोंदी आहेत. मंडणगड ५, दापोली ८, खेड ५ आणि रत्नागिरीत १ अशा कुणबी मराठा नोंदी आढळल्या आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMaratha Reservationमराठा आरक्षण