शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

रत्नागिरीत तातडीने शंभर खाटांचे कोविड हॉस्पिटल सुरु करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 16:44 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रत्नागिरीतील उद्यमनगर येथे आणखी एक शंभर खाटांचे कोविड रुग्णालय तातडीने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी आॅनलाईन पत्रकार परिषदेत दिली. यासाठी आपण एक राज्यस्तरीय बैठक घेतल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देरत्नागिरीत तातडीने शंभर खाटांचे कोविड हॉस्पिटल सुरु करणार-उदय सामंत यांची माहितीलवकरच कर्मचारी, परिचारिकांच्या जागा भरणार

रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रत्नागिरीतील उद्यमनगर येथे आणखी एक शंभर खाटांचे कोविड रुग्णालय तातडीने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी आॅनलाईन पत्रकार परिषदेत दिली. यासाठी आपण एक राज्यस्तरीय बैठक घेतल्याचे त्यांनी सांगितले.या बैठकीला आरोग्य विभागाचे सचिव प्रदीप व्यास, मेडिकल एज्युकेशनचे संजय मुखर्जी, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, आरोग्य सभापती महेश म्हाप, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, जिल्हा वैद्यकीय अधिकारी बबिता कमलापूरकर, हेल्थ संचालिका अर्चना पाटील आदी उपस्थित होते.या बैठकीत रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाला कसा रोखता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली. खेड उपजिल्हा रुग्णालय, कामथे उपजिल्हा रुग्णालय हे रुग्णालय म्हणून सुरू राहतील. तसेच वालावलकर हॉस्पिटल नॉन कोविड हॉस्पिटल म्हणून सुरू केले जाईल, अशी माहिती सामंत यांनी दिली. त्याचबरोबर घरडा हॉस्पिटल, वसतिगृह, इमारत हेही जिल्हा प्रशासनाने ताब्यात घ्यावी व याठिकाणी कोरोना रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत, असेही ठरविण्यात आले. तसेच खाजगी रुग्णवाहिकाही भाड्याने घेण्याचा निर्णय झाला आहे.

लवकरच कर्मचारी, परिचारिका यांच्या रिक्त जागा भरल्या जातील, असेही सामंत यांनी सांगितले. एमबीबीएस डॉक्टर मिळाले नाहीत तर बीएएमएस घेतले जातील, जीएनएम परिचारिका मिळाल्या नाहीत तर एएनएम घेतल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली.रत्नागिरीतील खासगी हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल करावे, असा विषयही या बैठकीत पुढे आला. रत्नागिरीतील काही डॉक्टरांनी आपले हॉस्पिटल देण्यास परवानगी दिल्याचे सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरी