शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत?
3
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
4
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
5
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
6
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
7
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
8
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
9
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
10
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
11
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
12
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
13
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
14
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
15
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
16
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
17
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
18
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
19
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
20
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय

कोकणच्या पर्यटनाला नशेचा विळखा !

By admin | Updated: October 1, 2016 00:19 IST

दापोलीला गालबोट : नशेमुळे मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ; स्थानिकांना अत्यंत वाईट अनुभव

दापोली : कामाच्या तणावातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी दापोलीला चांगलीच पसंती दिली असल्याचे पर्यटकांच्या वाढत्या संख्येवरून समोर येत आहे. परंतु या क्षेत्रामध्ये मात्र पर्यटक मद्यप्राशन जास्त प्रमाणात करीत असल्याचे त्यांच्या वर्तणुकीतून प्रथमदर्शनी समोर येत आहे. त्यामुळे पर्यटनाला चक्क नशेचा विळखा बसल्याचे दिसत आहे. दापोलीत येणारे पर्यटक मौजमजेसाठी येतात की, नशेचा आनंद लुटण्यासाठी येतात, असा सवाल आता उपस्थित होत आहे.दापोलीत पर्यटनाला येणारे पर्यटक पुरूष ग्रुपने येतात तर काही आपल्या कुुटुंबाबरोबर येतात. परंतु पुरूष गटाने येणाऱ्या मंडळींमध्ये दारूची नशा करणारे अनेक चेहरे असल्याने नशा चढल्यावर त्यांच्या वागण्यात बदल होतो. नशेत असलेल्या पर्यटकांच्या वाईट वर्तवणुकीचा इतर पर्यटक मंडळींसह स्थानिक ग्रामस्थांना त्रास होऊ लागला आहे. यामध्ये कधी मारामारी करणे, शिविगाळ करणे, मद्यपान करून भरधाव वेगानेगाडी चालवणे असे प्रकार आजकाल सागरी किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. या साऱ्याचा फटका मात्र इतर पर्यटक मंडळींना बसण्याची शक्यता सध्या दापोली पर्यटन ठिकाणच्या गावातून व्यक्त करण्यात येत आहे. कचरा करू नये, अपूर्ण कपड्यात फिरू नये, अशा प्रकारची बंदी स्थानिक प्रशासनाकडून घातली आहे.यावर्षी पाळंदे येथे काही पर्यटक युवकांनी मद्याच्या नशेत मारामारी केली होती. केळशी येथे स्थानिकांवर चाकूने हल्ला केला होता. त्यांच्यावर दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच सागरी किनाऱ्यावर नशेमध्ये भरधाव गाडी चालविणे, मारामाऱ्या करणे आदी गैरप्रकार वाढले आहेत. स्थानिकांच्या पुढाकाराने सदर व्यक्तीस समजावण्यात येते. २४ सप्टेंबर रोजी कर्दे-मुरूडच्या मध्य भागात एका पर्यटकाची गाडी समुद्राच्या पाण्यात उलटली आणि त्यात त्याचा मृत्यूदेखील झाला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार सदर युवक मद्यधुंद अवस्थेत होते. अशा मद्यप्राशन करणाऱ्या पर्यटकांमुळे इतर पर्यटकांच्या पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गाड्या घेऊन पर्यटक समुद्रावर जातात आणि आपल्याला वाटेल तशा चालवतात. त्यामुळे पायी सफर करणाऱ्या पर्यटकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)मुंबई, पुणे, गोवा, सातारा, कोल्हापूर, सांगली या ठिकाणांहून पर्यटक दापोलीला पर्यटनासाठी येतात आणि नशेत मौजेमजा करतात. गेल्या पाच ते सहा वर्षात सुमारे १ कोटीपेक्षा अधिक पर्यटकांनी दापोली शहराला भेट दिली होती, तर यावर्षी एप्रिल ते मे या महिन्यामध्ये जवळपास २९ हजार २००पेक्षा अधिक पर्यटक दापोली शहरात पर्यटनाला आल्याचा आकडा समोर आला आहे.