शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

वंदे भारतची कोकणवासियांना उत्सुकता; पण ओडिशातील भीषण अपघाताने मन विषण्ण

By मेहरून नाकाडे | Updated: June 3, 2023 19:22 IST

ओडिशातील दुर्दैवी अपघातामुळे मडगाव-कोकण रेल्वेमार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसचा नियोजित उद्घाटन सोहळा रद्द

रत्नागिरी : ओडिशातील दुर्दैवी अपघातामुळे मडगाव - कोकण रेल्वेमार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसचा शनिवारी (दि. ३) नियोजित असलेला उद्घाटन सोहळा रद्द झाला आहे. काही दिवसांपूर्वी कोकण रेल्वेमार्गावर या गाडीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर सर्वांना ही गाडी सुरू होण्याची उत्सुकता लागून राहिली होती; मात्र या भीषण अपघातामुळे सर्वांचंच मन विषण्ण झालं आहे, अशी प्रतिक्रिया या गाडीतून पहिला प्रवास करण्यासाठी विशेष निमंत्रित म्हणून मडगाव येथे उपस्थित असलेले रत्नागिरीचे सेवानिवृत्त प्राध्यापक उदय बोडस यांनी व्यक्त केली आहे. तीन जून रोजी  केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत कोकण रेल्वेमार्गावरची पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मडगाववरून छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाण्यासाठी सुटणार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार होते.  ज्या ठिकाणी ती गाडी थांबणार होती, त्या प्रत्येक स्टेशनवरही गाडीच्या स्वागताची जंगी तयारी झाली होती. या पहिल्या गाडीतून प्रवास करण्यासाठी काही रेल्वे फॅन्स, तसेच पत्रकार मडगावमध्ये दाखल झाले होते. रत्नागिरीतील सेवानिवृत्त प्राध्यापक उदय बोडस हेदेखील विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. त्यांनी आतापर्यंत कोकण रेल्वेमार्गावरच्या २२ नव्या गाड्यांतून पहिला प्रवास केला आहे.वंदे भारतसारखी आधुनिक रेल्वे कोकण रेल्वेमार्गावर येत असल्याचा जो उत्साह होता, तो शुक्रवारी ओडिशात झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे एका क्षणात मावळला आहे. आता सगळे कर्तव्य म्हणून काम करत आहेत; पण कोणातच उत्साह दिसत नाही. वंदे भारत एक्स्प्रेस गाडी रिकामीच शुक्रवारी रात्री मुंबईला रवाना झाली.कोकण रेल्वेच्या १९९६ च्या उद्घाटनाच्या प्रवासापासून अलीकडच्या तेजस एक्स्प्रेसपर्यंतच्या प्रत्येक पहिल्या गाडीने प्रा. बोडस यांनी प्रवास केला आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस एलचएबी डब्यांसह धावू लागली, तेव्हा कोरोना निर्बंधांमुळे मला त्या गाडीतून जाता आलं नाही. त्यानंतर सुरू झालेल्या बुधाना ते मंगळुरू जंक्शन आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते कन्याकुमारी या दोन गाड्यांमधून त्यांनी केलेले प्रवास अनुक्रमे २१ आणि २२वे होते.  वंदे भारत एक्स्प्रेसमधला प्रवास २३ वा ठरला असता; मात्र दुर्दैवाने तो योग आला नाही, अशी प्रतिक्रियाही बोडस यांनी व्यक्त केली.दरम्यान, कोकण रेल्वेमार्गावरच्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनाची पुढील तारीख निश्चित झाल्यावर जाहीर केली जाईल, असे कोकण रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसOdishaओदिशाAccidentअपघात