शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

गणेशभक्त रखडले; कोकण रेल्वेच्या गाड्या २ ते ५ तासाने उशिरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 22:43 IST

कोकणात गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात मुंबईकर दाखल होत असतात.

रत्नागिरी : कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे प्रशासनाने जादा गाड्या सोडल्या होत्या. मात्र, या मार्गावरून धावणाऱ्या गाड्या २ ते ५ तासाने उशिराने धावत होत्या. त्यामुळे कोकणात येणारे गणेशभक्त अर्ध्या वाटेतच लटकले होते.

कोकणात गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात मुंबईकर दाखल होत असतात. कोकणात येणाऱ्या  मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने जादा गाड्यांची व्यवस्था केली होती. त्याचबरोबर कोकण रेल्वेच्या २१० फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. बहुतांशी मुंबईकरांनी कोकण रेल्वेनेच येणे पसंत केले होते. त्यामुळे या मार्गावरून धावणाºया गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी होती. जनरल डब्यांबरोबरच आरक्षणाच्या डब्यात बसून प्रवाशांनी आपल्या गावी येणे पसंत केले होते. त्यामुळे गाडीचे सर्वच डबे फुल्ल झाले होते. मिळेल तिथे बसून अनेकांनी प्रवास करणे पसंत केले.

मात्र, गणेशोत्सवासाठी येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास रडतकढतच झाला. या मार्गावरून धावणाºया सर्वच गाड्या २ ते ५ तासाने उशिराने धावत होत्या. यामध्ये ०१०३५ पनवेल - सावंतवाडी गणपती स्पेशल गाडी ३९ मिनिटे, १२६१८ मंगला एक्स्प्रेस ३६ मिनिटे, १०१०३ मांडवी एक्स्प्रेस २९ मिनिट, ०२१९८ जबलपूर स्पेशल ५ तास ५१ मिनिटे, ०१००१ सावंतवाडी गणपती स्पेशल ५ तास ४८ मिनिटे, १२०५१ जनशताब्दी एक्स्प्रेस ५६ मिनिट, १२४५० गोवा संपर्कक्रांती २ तास २२ मिनिटे, ०१२२५ पनवेल - सावंतवाडी २ तास ५४ मिनिटे, २२४१४ राजधानी एक्स्प्रेस २ तास १९ मिनिटे, ११००३ दादर - सावंतवाडी १ तास २५ मिनिटे, १२१३३ मंगलोर एक्स्पे्रस २ तास २२ मिनिटे, १६३४५ नेत्रावती एक्स्प्रेस ९ तास ४६ मिनिटे, २२११३ कोचूवेली एक्स्प्रेस ४ तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे या गाड्यांनी येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेस्थानकावरून घरी पोहोचण्यासही उशीर झाला.

 

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेGaneshotsavगणेशोत्सव