शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

देखभाल इंजिन बंद पडल्याने कोकण रेल्वे वाहतूक दोन तास विस्कळीत 

By मनोज मुळ्ये | Updated: August 26, 2024 16:11 IST

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या सावर्डे ते आरवली दरम्यानच्या मार्गावर रेल्वे ट्रॅकची देखभाल करणारे इंजिन बंद पडल्याने सोमवारी सकाळी रेल्वे ...

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या सावर्डे ते आरवली दरम्यानच्या मार्गावर रेल्वे ट्रॅकची देखभाल करणारे इंजिन बंद पडल्याने सोमवारी सकाळी रेल्वे वाहतूक दोन तासांपेक्षा अधिक काळ विस्कळीत झाली होती. यामुळे गोव्याच्या दिशेने धावणाऱ्या मुंबई सीएसएमटी ते मडगाव वंदे भारत एक्स्प्रेससह जनशताब्दी एक्स्प्रेसलाही फटका बसला. सोमवारी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.कोकण रेल्वेच्या सावर्डे ते आरवली या मार्गावर देखभालीसाठी फिरणारे सी. एम. एस. मशीन अचानक बंद पडल्यामुळे या भागातून याचदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेससह जनशताब्दी एक्स्प्रेस तसेच मुंबईच्या दिशेने धावणारी कोचुवेली -एलटीटी गरीब रथ एक्स्प्रेस या गाडीसह अन्य काही गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या.या घटनेमुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर वाहतुकीला निर्माण झालेला अडथळा दूर करण्यात सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास यश आले. त्यामुळे विविध स्थानकांवर थांबून ठेवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये प्रवाशांना तिष्ठत बसावे लागले.सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आपत्कालीन सायरन वाजल्याने अशा घटनांना सामोरे जाण्यासाठी २४ तास सतर्क असलेली कोकण रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळाकडे तातडीने रवाना झाली. मार्गावर बंद पडलेले देखभाल इंजिन सकाळी १०:२४ वाजता बाजूला करण्यात आल्यावर रेल्वेची विस्कळीत झालेली वाहतूक पूर्वपदावर आली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKonkan Railwayकोकण रेल्वे