शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कोकण रेल्वेची कारवाई, वसूल केला 'इतक्या' कोटीचा दंड

By शोभना कांबळे | Updated: January 15, 2024 18:07 IST

दोषी आढळलेल्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार

रत्नागिरी : कोकण रेल्वेने प्रवास करताना विना तिकीट प्रवास करणाऱ्या ७,०१३ प्रवाशांवर कोकण रेल्वे प्रशासनाने कारवाई करत महिनाभरात तब्बल १ कोटी ९५ लाख ६४ हजार ९२६ रुपयांचा दंड वसूल केला आहे. पाच महिन्यात २७,८३८ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून ४ कोटी ८७ लाख ८५ हजार १५२ रुपयांचा दंड वसूल केला आहे.गाडीला गर्दी असल्याची संधी साधून काही प्रवासी विना तिकीट गाडीत घुसतात. त्यामुळे रीतसर तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर अन्याय होतो. त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाचे करोडो रुपयांचे नुकसान होते. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यासाठी आॅगस्ट २०२३ महिन्यापासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्रत्येक महिन्याला कोकण रेल्वे प्रशासनाची ही कारवाई सुरू असते. डिसेंबर २०२३ या महिन्यात राबविलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत विना तिकीट प्रवास करणाऱ्या ६,६७५ प्रवाशांकडून १ कोटी ९५ लाख ६४ हजार ९२६ रूपयांचा दंड वसूल केला आहे.ऑगस्ट ते डिसेंबर २०२३ या पाच महिन्यात करण्यात आलेल्या तिकीट तपासणीत २७,८३८ विनातिकीट प्रवासी आढळले. त्यांच्याकडून ४ कोटी ८७ लाख ८५ हजार १५२ रुपयांचा दंड४ कोटी ८७ लाख ८५ हजार १५२ रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. यापुढेही तिकीट तपासणी मोहीम नियमित सुरू रहाणार आहे. यात दोषी आढळलेल्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येणारआहे.कोकण रेल्वे आॅगस्ट २०२३ पासून सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. यापुढेही कोकण रेल्वे प्रशासनाकडून ही धडक कारवाई सुरूच राहणार आहे. अभिमानाने प्रवास करा, सन्मानाने प्रवास करा, तिकीट खरेदी करा आणि अभिमानाने प्रवास करा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.

तिकीट तपासणीची मोहीम कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गावर नियमित सुरू राहणार आहे. प्रवाशांनी योग्य व वैध तिकीटासह प्रवास करावा दंड टाळावा.- सचिन देसाई, जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKonkan Railwayकोकण रेल्वेticketतिकिटpassengerप्रवासी