शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

किसान सन्मान योजना : यादी तयार करण्यासाठी घाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 13:51 IST

रत्नागिरी : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आले ...

ठळक मुद्देकिसान सन्मान योजना : यादी तयार करण्यासाठी घाई१ लाख ७५ हजार ४१० शेतकऱ्यांची नोंदणी

रत्नागिरी : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्राथमिक यादी तयार करण्यात आली असून, ५ एकरपेक्षा कमी शेतीक्षेत्र असलेल्या १ लाख ७५ हजार ४१० शेतकऱ्यांची नोंदणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.गावनिहाय यासाठीच्या याद्या तयार करण्याच्या कामात महसूल विभागाचे आणि कृषी विभागाचे कर्मचारी गुंतले आहेत. यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांची संख्या चिपळूण तालुक्यात असून, संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वात कमी आहे.पाच एकरपेक्षा कमी शेतीक्षेत्र असलेला शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. या योजनेंतर्गत कुटुंबाला प्रतिवर्षी ६ हजार रूपये तीन टप्प्यात देण्यात येणार आहेत. कुटुंबामध्ये पती-पत्नी आणि त्यांची १८ वर्षांच्या आतील मुले यांचा समावेश असेल.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गावनिहाय शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दिनांक २० फेब्रुवारी २०१९पर्यंत शेतकऱ्यांची प्राथमिक यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी गावपातळीवर प्रसिद्ध करून हरकती घेणे आणि त्यानंतर दुरूस्तीसह अंतिम याद्या तयार करुन तहसीलदारांकडे सादर केल्या जाणार आहेत.

या कामासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. योजनेत प्रारंभी आॅफलाईन काम करण्यात आले व त्यानंतर आॅनलाईन माहिती भरण्यात येणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी