शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

रत्नागिरीतील कीर्तनसंध्या महोत्सवही हायटेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 11:08 IST

Religious programme Ratnagirinews- गेल्या २०१२ सालापासून रत्नागिरीत सुरू असलेला कीर्तनसंध्या महोत्सव आता जगभरातील कीर्तनप्रेमींना ऑनलाईन पाहायला मिळणार आहे. कीर्तनसंध्येच्या दशकपूर्तीनिमित्ताने ही व्यवस्था सुरू करण्यात येत असून, येत्या २१ फेब्रुवारीपासून महोत्सवातील कीर्तने यू-ट्युबवर उपलब्ध होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रीडांगणावर कार्यक्रमाचे आयोजन करणे टाळून ऑनलाईन पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे कोरोनामुळे ऑनलाईन कार्यक्रमाचे नियोजन कारगिल युद्ध कीर्तनमालिकेचा मुख्य विषय, उच्चांक मोडणारा राज्यभरातील एकमेव उपक्रम

रत्नागिरी : गेल्या २०१२ सालापासून रत्नागिरीत सुरू असलेला कीर्तनसंध्या महोत्सव आता जगभरातील कीर्तनप्रेमींना ऑनलाईन पाहायला मिळणार आहे. कीर्तनसंध्येच्या दशकपूर्तीनिमित्ताने ही व्यवस्था सुरू करण्यात येत असून, येत्या २१ फेब्रुवारीपासून महोत्सवातील कीर्तने यू-ट्युबवर उपलब्ध होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रीडांगणावर कार्यक्रमाचे आयोजन करणे टाळून ऑनलाईन पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.कारगिल युद्धाचे वर्णन हा यावर्षीच्या कीर्तनमालिकेचा मुख्य विषय आहे. भारताचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोवण्यासाठी कीर्तन हे माध्यम निवडावे, असे ठरले आणि २०१२ साली कीर्तनसंध्या समूह स्थापन झाला. अवधूत जोशी, नितीन नाफड, उमेश आंबर्डेकर, मकरंद करंदीकर, गुरुप्रसाद जोशी, रत्नाकर जोशी, योगेशानंद हळबे, योगेश गानू, मोरेश्वर जोशी, मिलिंद सरदेसाई, अभिजित भट, गौरांग आगाशे, श्रीनंदन केळकर, महेंद्र दांडेकर इत्यादी मंडळी त्यासाठी एकत्र आली. राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे यांची त्याला सक्षम साथ लाभली.या उपक्रमात मुख्य विषयांबरोबरच महाराणी ताराबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, आद्यक्रांतिकारक वासुदेव फडके अशा अनेक शूरवीर व्यक्तिमत्त्वांची ओळखही आफळेबुवांनी करून दिली. कीर्तनाचे गर्दीचे उच्चांक मोडणारा राज्यभरातील हा एकमेव उपक्रम ठरला आहे.वादक कलाकार हेरंब जोगळेकर, मधुसूदन लेले, उदय गोखले, अभिजित भट, राजा केळकर, विलास हर्षे, वरद सोहोनी, मिलिंद टिकेकर, प्रथमेश तारळकर, राजू धाक्रस, मंगेश चव्हाण, केदार लिंगायत, वैभव फणसळकर, राजू किल्लेकर, हरीश केळकर, उदयराज सावंत, नेपथ्य अमरीश सावंत, चंदन खेराडे व इतर तंत्रज्ञांचीही उपक्रमाला मदत लाभली. त्यामुळे या कार्यक्रमाची व्याप्ती वाढली आहे. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमRatnagiriरत्नागिरी