शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खेडमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण,आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 18:11 IST

खेड तालुक्यातील ज्ञानदीप माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील इयत्ता बारावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी खेड पोलीस स्थानकात दिली आहे. खेड पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देखेडमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे अपहरणआरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल

खेड :तालुक्यातील ज्ञानदीप माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील इयत्ता बारावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी खेड पोलीस स्थानकात दिली आहे. खेड पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.हृतिक मोहन गोलामडे (१७) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील मोहन गोलामडे (रा. शंकरवाडी, चिपळूण) यांनी खेड पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. हृतिक हा मूळचा चिपळूण येथील असून, शिक्षणानिमित्त तो खेड तालुक्यातील खोंडे येथील ज्ञानदीप माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत शिकत होता.

तो त्याच गावात भाड्याने खोली घेऊन राहत होता. गुरुवार दिनांक १७ जानेवारी पासून तो शाळेत आणि त्याच्या खोलीत आणि गावात देखील निदर्शनास आला नाही.त्याच्या वडिलांनी आणि त्याच्या मित्रांनी सगळीकडे शोध घेतला. मात्र तो न सापडल्याने त्याचे वडील मोहन गोलामडे यांनी खेड पोलीस स्थानकात कोणीतरी आपल्या मुलाला फूस लावून त्याचे अपहरण केल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार खेड पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड विधान कलम ३६३ अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल गंभीर करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी