शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

खेर्डी सरपंचाविरोधात अविश्वास ठराव पारित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 13:11 IST

खेर्डी सरपंचाविरोधात अविश्वास ठराव पारीत झाला. ग्रामपंचायतीत बुधवारी झालेल्या विशेष सभेत १३ विरुद्ध २ मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला. १७ पैकी दोन सदस्य अनुपस्थित राहिले. अविश्वास ठरावाच्या बाजूने १३, तर २ सदस्यांनी विरोधी मतदान केले.

ठळक मुद्देखेर्डी सरपंचाविरोधात अविश्वास ठराव पारितविरोधकांनी केली फटाक्यांची आतषबाजी

चिपळूण : खेर्डी सरपंचाविरोधात अविश्वास ठराव पारीत झाला. ग्रामपंचायतीत झालेल्या विशेष सभेत १३ विरुद्ध २ मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला. १७ पैकी दोन सदस्य अनुपस्थित राहिले. अविश्वास ठरावाच्या बाजूने १३, तर २ सदस्यांनी विरोधी मतदान केले.सरपंच विरोधी अविश्वास सहमत होताच विरोधकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. तहसीलदार जीवन देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी ११ वाजता सभेला सुरुवात झाली.

सभेला एकूण १५ सदस्य उपस्थित होते. सुरुवातीला अविश्वास दाखल केलेल्या ठरावाची तहसीलदारांनी प्रोसिडिंगवर सह्या घेत खात्री केली. त्यानंतर अविश्वास ठरावाचे वाचन झाले. दशरथ दाभोळकर यांनी सरपंच विरोधी अविश्वास ठराव मांडला. त्याला विश्वनाथ फाळके यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर प्रकाश पाथरवट, प्रकाश साळवी यांनी चर्चेद्वारे आपली मते मांडली. सरपंच जयश्री खताते यांनी आपले मत मांडले. शेवटी अविश्वास ठरावावर हातवर करून मतदान झाले. अविश्वास ठरावाच्या बाजूने १३, तर विरोधीत २ मते पडली.सभेला झरिना चौगुले व नया शिगवण हे दोन सदस्य अनुपस्थित होते. जयश्री खताते, प्रियंका भुरण यांनी अविश्वास विरोधी मतदान केले. ठरावाच्या बाजूने प्रकाश साळवी, प्रकाश पाथरवट, दशरथ दाभोळकर, विश्वास फाळके, सुनील दाते, देविका डिके, विकल्पा मिरगल, अवंतिका खरावते, विनिता मोहिते, प्राची शिर्के, गजानन जाधव, विनय दाते, प्रसाद सागवेकर यांनी मतदान केले.

टॅग्स :sarpanchसरपंचRatnagiriरत्नागिरी