शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

खेड : खाडीपट्ट्यातील मासेमरतूक रोजचीच!

By admin | Updated: September 20, 2014 00:21 IST

जगबुडीतील थैमान : प्रदूषित पाणी घेतेय माशांचा जीव...

खेड : खाडीपट्ट्यातील जगबुडी नदी आणि खाडीत दररोज मासे मरण्याच्या घटना घडत आहेत़ माशांचा अक्षरश: खच पडला आहे. लोटे आद्यौगिक वसाहतीमधून सोडण्यात येत असलेल्या रासायानिक पाण्यामुळेच हे मासे मरत होत असल्याचे अनेकवेळा केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. तसा अहवाल येथील तहसीलदारांना तसेच कोल्हापुर येथील प्रदूषण नियंत्रण विभागाला सादर करण्यात आला आहे़ सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही हे रासायनिक पाणी सोडण्यात येत असल्याने न्यायालयाचा अवमान होत होत आहे़ यामुळे संबंधित कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे़बहिरवली, तुंबाड आणि कर्जी परिसरातील गावातील नदी आणि खाडी परिसरात असे प्रकार नित्याचे झाले आहेत़ येथील खाडीलगत जगबुडी नदीची वारंवार पाहणी व पंचनामा करण्यात आला़ यावेळी नदीतील पाण्याचा रंग हलका काळसर आढळला़ तसेच नदीपात्रात काळचरू, बोथरेट, कोळंबी आदी प्रकारचे मासे मृतावस्थेत आढळले होते़ हे मासे पाण्यावर तरंगताना आढळल्याचे ग्रामस्थांनी पाहिले.याबाबत तहसीलदार यांना तसा अहवालदेखील सादर करण्यात आले आहेत. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बोटचोपे पद्धतीच्या भूमिकेमुळे या मासेमारीला आळा घातला जात नसल्याचे दिसून येत आहे. न्यायालयात याबाबत चौकशी सुरू असतानाही सीईटीपीतून पाणी सोडण्यात येते तसेच यामुळे मासे मरण्याच्या घटना होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.हा न्यायालयाचा अवमान आहे. याबाबत पुनर्दुरूस्ती याचिका लवकरच दाखल होणार असल्याची माहिती खाडीपट्ट्यातील ग्रामस्थांनी दिली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ या प्रकाराकडे लक्ष देत नसल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)प्रकार थांबणार कधी?लोटे औद्योगिक वसाहतीतील शेतकरी, नागरिकांनी व्यक्त केली चिंता प्रदूषण नियंत्रण मंडळ करतेय कायमासे मरण्याचे प्रकार वारंवारसंबंधित कारखान्यावर कारवाईची मागणीबहिरवली, तुंबाड,कर्जी गावाना मोठा फटकापंचनाम्याचा काय उपयोग