शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कडवईचा मास्टरमार्इंड युट्यूबवर लोकप्रिय, चॅनेलचे ४ लाखाहून अधिक ग्राहक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 18:47 IST

संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील अभिजीत चंद्रशेखर मोहिरे हा एक सर्वसामान्य कुटुंबातील तरुण. कोणतेही तांत्रिक शिक्षण न घेता गाड्यांची दुरुस्ती, मोबाईल दुरुस्ती, संगणक दुरुस्ती अशी कामे लिलया करतो. सध्या त्याचे युट्यूबवर मास्टरमार्इंड टेक हे चॅनेल चांगलेच लोकप्रिय होत आहे. यातून तो रिपेरींग, देखभाल, नवीन अ‍ॅक्सेसरीज फिटींग यांची माहिती व्हिडीओद्वारे प्रसारीत करत असतो. त्याच्या या चॅनेलला वर्षभरात ४ लाखाहन अधिक लोकांनी प्रतिसाद दिला.

ठळक मुद्देकडवईचा मास्टरमार्इंड युट्यूबवर लोकप्रियचॅनेलचे ४ लाखाहून अधिक ग्राहक

मिलींद चव्हाणआरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील अभिजीत चंद्रशेखर मोहिरे हा एक सर्वसामान्य कुटुंबातील तरुण. कोणतेही तांत्रिक शिक्षण न घेता गाड्यांची दुरुस्ती, मोबाईल दुरुस्ती, संगणक दुरुस्ती अशी कामे लिलया करतो. सध्या त्याचे युट्यूबवर मास्टरमार्इंड टेक हे चॅनेल चांगलेच लोकप्रिय होत आहे. यातून तो रिपेरींग, देखभाल, नवीन अ‍ॅक्सेसरीज फिटींग यांची माहिती व्हिडीओद्वारे प्रसारीत करत असतो. त्याच्या या चॅनेलला वर्षभरात ४ लाखाहन अधिक लोकांनी प्रतिसाद दिला.अभिजीत मोहिरे याला लहानपणापासून थ्री इडियट सिनेमातल्या रंचूप्रमाणे जी वस्त मिळेल ती खोलून पहायची सवय. त्याने एखादी वस्तू नवीन घेतली तरी ती खोलून तिचा अभ्यास करतो. यातूनच त्याला रिपेअरींगची आवड निर्माण झाली. कॉलेजनंतर बीएड, एमए अशा पदव्या घेतल्यानंतरही त्याचे मन इतर क्षेतात रमत नव्हते. त्याच्या या स्पर्धातून तो संगणक, मोबाईल गाड्यांची दुरुस्ती कोणतेही तांत्रिक शिक्षण न घेता शिकला.

यातून नवनवीन प्रयोग करत राहिला. डायनामा तयार करणे, ध्वनीलहरीवर प्रयोग करुन रेडिओ तयार करणे असे अनेक नवीन प्रयोग तो लहानपणीच करायचा. गाडी कोणतीही असो. तिचा प्रॉब्लेम तो गाडी न खोलाच सांगू शकतो. मोबाईल असो व संगणक त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग करुन त्याचा प्रॉब्लेम शोधण्याचा तो प्रयत्न करतो.

हा छंद जोपासत त्याने यूट्यूबवर मास्टरमार्इंंड टेक या नावाने यू ट्यूब चॅनेल तयार केले आहे. त्यावर तो दुरुस्ती, देखभाल, नवीन अ‍ॅक्सेसरीज फिटींग याचे व्हिडीओ अपलोड करतो. आता तर हे व्हिडीओ पाहून लोक रिपेअरींग शिकू लागले आहेत. या यू ट्यूब चॅनेलला जगभरातून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

वर्षभरातच त्याच्या चॅनेलचे ४ लाखाहून अधिक ग्राहक झाले आहेत. व्हिडीओची भाषा हिंदी असल्याने सर्वाधिक लोक याचा फायदा घेत आहेत. तरुणांनी यातून आदर्श घेत आपली कला कौशल्य जोपासत सोशल मिडीयाचा वापर करुन जगापर्यंत पोहोचवली पाहिजेत असा संदेशच जणू यातून समोर येतो.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाRatnagiriरत्नागिरी