मंडणगड : दिल्लीतील दंगल बंदोबस्ताचा ताण आल्याने मंडणगड तालुक्यातील लाटवण येथील मुकेश नारायण कदम या जवानाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या जवानाचे पार्थीव मंगळवारी लाटवणला आणले असून, लाटवण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.सीएएवरून दिल्ली उसळलेल्या हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बंदोबस्तासाठी भारतीय जवानांनाही तैनात करण्यात आले आहे. दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न करण्यात येत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सुरक्षा रक्षकही तैनात केले आहेत.दिल्लीतील दंगल बंदोबस्तावर मंडणगड तालुक्यातील लाटवण येथील भारतीय सैन्यात कर्तव्य बजावणाऱ्या मुकेश नारायण कदम हेदेखील तैनात होते. मात्र, या दंगलीच्या बंदोबस्ताचा ताण पडल्याने मुकेश कदम यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.
दिल्लीत मृत्यू झालेल्या मंडणगडातील जवानावर लाटवण येथे अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 19:30 IST
दिल्लीतील दंगल बंदोबस्ताचा ताण आल्याने मंडणगड तालुक्यातील लाटवण येथील मुकेश नारायण कदम या जवानाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या जवानाचे पार्थीव मंगळवारी लाटवणला आणले असून, लाटवण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दिल्लीत मृत्यू झालेल्या मंडणगडातील जवानावर लाटवण येथे अंत्यसंस्कार
ठळक मुद्देदिल्लीत मृत्यू झालेल्या मंडणगडातील जवानावर लाटवण येथे अंत्यसंस्कारबंदोबस्ताचा ताण, पार्थिव गावी