शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत जनशिक्षण संस्था सुरू करणार : सुरेश प्रभू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 15:34 IST

Suresh Prabhu Ratnagiri Women- स्वयंरोजगाराच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढले तरच आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल. त्यासाठी येत्या काळात रत्नागिरीत जनशिक्षण संस्था सुरू करण्याचा आपला मानस असल्याची माहिती खासदार सुरेश प्रभू यांनी दिली.

ठळक मुद्देरत्नागिरीत जनशिक्षण संस्था सुरू करणार : सुरेश प्रभूराजापूर येथे स्वयंसेवी संस्थांचा मेळावा

राजापूर : स्वयंरोजगाराच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढले तरच आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल. भविष्यकाळात नोकऱ्या हा अत्यंत कठीण विषय होणार आहे. नोकऱ्या आणि जीवनाचा उद्धार याची सांगड घालण्याची गरज आहे. महिलांना तर त्यामधून कुटुंबाची आणि समाजाची क्रांती होऊ शकते. हाच कार्यक्रम आपल्याला भविष्यात राबवायचा असून, प्रत्येक पाच गावांमध्ये एक परिवर्तन केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी येत्या काळात रत्नागिरीत जनशिक्षण संस्था सुरू करण्याचा आपला मानस असल्याची माहिती खासदार सुरेश प्रभू यांनी दिली.खासदार सुरेश प्रभू सोमवारी राजापूर तालुका दौऱ्यावर आले होते. यावेळी राजापूर हायस्कूल येथे मानव साधन विकास केंद्र अंतर्गत परिवर्तन केंद्र, राजापूरतर्फे आयोजित स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींच्या मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार प्रमोद जठार, भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव, राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. छाया जोशी उपस्थित होते.यावेळी खासदार सुरेश प्रभू म्हणाले की, विजेचा प्रश्न मिटविण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांसाठी ऊर्जामंत्री असताना ११० कोटी रुपये राखून ठेवले होते. जलविद्युत व्हावे म्हणून आपण प्रयत्न केले होते. मात्र, पुढच्या काळात हे प्रकल्प मार्गी लागू शकले नाहीत.

स्थानिक लोकांना रोजगार किंवा नोकऱ्या कशा मिळतील, हे पाहिले पाहिजे. या गोष्टी करण्याची प्राथमिक जबाबदारी सरकारची आहे, असे सुरेश प्रभू म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. प्रशांत पाध्ये यांनी केले, तर सूत्रसंचालन अ‍ॅड. सुशांत पवार यांनी केले.आत्मनिर्भरचा अर्थ समजापंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारताचा संदेश दिला आहे. केवळ रस्ते, वीज, पाणी म्हणजे देश नाही, तर देश म्हणजे देशाचे नागरिक. त्यातही अशा देशाचे नागरिक जे आजही विकासापासून वंचित आहेत. अशांना आत्मनिर्भर करण्याची गरज आहे. त्यांच्या जीवनात विकासाची गंगा कशी येईल, अशा लोकांना आत्मनिर्भर कसे करायचे यादृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत, असे सुरेश प्रभू म्हणाले.महिलांचा सन्मान कराआपल्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी आपण एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. समाजामध्ये परिवर्तन घडवायचे असेल तर महिला खऱ्या अर्थाने सक्षम झाल्या पाहिजेत. जेव्हा महिला सक्षम होईल तेव्हा ते कुटंब आणि समाजही सक्षम होईल यासाठी केवळ एक दिवसाचा महिला दिन साजरा न करता कायमच महिलांचा सन्मान केला पाहिजे, असे प्रभू यांनी सांगितले. 

टॅग्स :WomenमहिलाSuresh Prabhuसुरेश प्रभूRatnagiriरत्नागिरी