शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

करजुवेत सक्शन पंपांना जलसमाधी : संगमेश्वर तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 00:23 IST

संगमेश्वर तालक्यातील करजुवे आणि माखजन खाडी परिसरात सक्शन पंपाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळूउपसा होत असल्याची बातमी ‘लोकमत’मधून प्रसिद्ध झाली होती.

ठळक मुद्देहातपाटीच्या परवानगीवर सक्शन पंपाच्या सहाय्याने वाळूउपसा

आरवली : संगमेश्वर तालक्यातील करजुवे आणि माखजन खाडी परिसरात सक्शन पंपाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळूउपसा होत असल्याची बातमी ‘लोकमत’मधून प्रसिद्ध झाली होती. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत प्रशासनाच्यावतीने त्यावर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईने वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

करजुवे आणि माखजन खाडीत गेल्या महिनाभरापासून हातपाटीच्या वाळूचा उपसा करण्याची परवानगी घेऊन सक्शन पंपाद्वारे मोठ्या प्रमाणात वाळूउपसा होत असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते. त्यानंतर तहसीलदार संदीप कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या भागात जाऊन या सक्शन पंपांवर धडक कारवाई करुन सक्शन पंप बोटीसहीत खाडीत बुडवल्याची चर्चा जोरात सुरू होती. त्यामुळे परिसरात होणाºया वाळू उपशाला लगाम बसल्याचे सांगण्यात येत होते.

मात्र, त्यानंतर काही दिवसातच करजुवे, नारडुवेच्या खाडी परिसरात पुन्हा एकदा सक्शन पंपाची धडधड सुरू झाल्याचे समोर आले होते. यावर पुन्हा एकदा ‘लोकमत’मधून आवाज उठवण्यात आला. हा वाळूउपसा सुरु असल्याचे वृत्त सोमवार, ४ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते.

या वृत्ताची दखल घेत रत्नागिरीचे प्रांताधिकारी अमित शेडगे, संगमेश्वरचे तहसीलदार संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसराची पाहणी करण्यात आली. या पाहणीमध्ये बेकायदा वाळूउपसा होत असल्याचे दिसून आले. यासाठी लावलेल्या सक्शन पंपांवर कारवाई करताना पंपासाठी वापरलेल्या बोटींना जलसमाधी देण्यात आल्याचे समजते. यावेळी मंडल अधिकारी मांगले, तलाठी उपस्थित होते. या कारवाईने संबंधित वाळू माफियांना चांगलीच जरब बसली आहे. मात्र, माखजन खाडी परिसरात वाळूउपसा करणारे सक्शन पंप या कारवाईतून सुटले असल्याची चर्चा होत आहे.

हातपाटीच्या सहाय्याने वाळू उपशाची परवानगी देताना, संबंधित व्यावसायिकांनी भरमसाठ रॉयल्टी भरली असून, हातपाटीच्या सहाय्याने ही रक्कम वसूल होणे शक्य नसल्यानेच प्रशासनाच्या मूक संमत्तीने सक्शन पंप लावले जात असल्याची चर्चा होत आहे. या भागात सुरू असणाºया वाळू उपशामुळे खाडीतील पाण्याचा प्रवाह बदलण्याची शक्यता अधिक आहे. याठिकाणी राजरोसपणे सुरू असणारा वाळूउपसा धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे सक्शन पंपाद्वारे होणारा हा वाळूउपसा कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे.पंप कसे मिळतात? : कारवाईचे काय?संगमेश्वर तालुक्यातील करजुवे, माखजन खाडीत गेल्या महिनाभरापासून वाळूउपसा.याबाबत ‘लोकमत’मधून वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.‘लोकमत’च्या वृत्तानंतर धडक कारवाई करून सक्शन पंप पाण्यात बुडविण्यात आले.बेकायदा होणाºया वाळू उपशाविरोधात कारवाई केल्यानंतर काही महिन्यातच हा व्यवसाय पुन्हा सुरू होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कारवाईनंतर पुन्हा हे सक्शन पंप कसे उपलब्ध होतात, याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीriverनदी