शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

रत्नागिरी : अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात २७ रोजी जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 17:00 IST

रिफायनरीचा निर्णायक लढा सुरु असतानाच आता अणुऊर्जा प्रकल्पाच्या आंदोलनाने दुसऱ्या इनिंगला सुरूवात केली आहे. जनहक्क समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार, दिनांक २७ आॅगस्टला जेलभरो आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनहक्क समितीच्या पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देअणुऊर्जा प्रकल्पाविरोधात २७ रोजी जेलभरो आंदोलनजनहक्क समितीच्या बैठकीत निर्णय

राजापूर : रिफायनरीचा निर्णायक लढा सुरु असतानाच आता अणुऊर्जा प्रकल्पाच्या आंदोलनाने दुसऱ्या इनिंगला सुरूवात केली आहे. जनहक्क समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार, दिनांक २७ आॅगस्टला जेलभरो आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनहक्क समितीच्या पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.तालुक्यात सर्वात प्रथम जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प तत्कालीन काँग्रेसप्रणित आघाडी शासनाच्या काळात आणण्यात आला. देशातील सर्वात मोठा असा हा १० हजार मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती करणारा प्रकल्प आहे. त्यामधून होणारे रेडीएशनमुळे तालुक्यातील निसर्गसंपदा, भातशेती, बागायती, मच्छिमारी यासहित मानवी जीवनावर त्याचे विपरीत परिणाम होतील.

या भीतीपोटी प्रकल्पग्रस्त परिसरातून मागील काही वर्षे या विरोधात लढा सुरु आहे. मागील एक दशकाच्या कार्यकालात अनेक आंदोलने कोकणभूमीने पाहिली आहेत. प्रशासन व स्थानिक प्रकल्पग्रस्त जनता यांच्यात अनेकवेळा संघर्ष झाला होता. काही आंदोलने हिंसक बनली होती. एका आंदोलनादरम्यान तर पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात तबरेज सायेकर हा आंदोलक गोळी लागून मृत्युमुखी पडला होता.युक्रेनमधील चर्नोबिलव अलिकडे जपानमधील फुकुशिमा येथे अणुऊर्जा प्रकल्पांतर्गत झालेल्या दुर्घटनेत मोठ्याप्रमाणावर किंमत मोजावी लागली होती. त्यामुळे हानीकारक असा जैतापूर प्रकल्प रद्द करावा, अशी जोरदार मागणी कायम आहे. तरीदेखील या प्रकल्पाचे काम सुरू असल्याने शासनाच्या या निर्णयाविरोधात प्रकल्पग्रस्तांनी आता जेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे. प्रकल्पाला विरोध करण्यासाठी कार्यरत असलेल्या जनहक्क समितीच्या नेतृत्वाखाली २७ आॅगस्ट रोजी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.समितीचे अध्यक्ष सत्यजीत चव्हाण, उपाध्यक्ष मन्सुर सोलकर, मच्छिमार नेते अमजद बोरकर, नदीम तमके, फकीर सोलकर यासहित बहुसंख्य प्रकल्प विरोधक या जेलभरो आंदोलनात सहभागी होणार आहेत. मागील काही महिन्यांत रिफायनरी विरोधात आंदोलने सुरु असताना आता अनेक महिने थंड असलेले जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधी जेलभरो आंदोलन पुकारण्यात आल्याने जैतापूरचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

टॅग्स :Jaitapur atomic energy plantजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पRatnagiriरत्नागिरी