शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

अखेर ४६ वर्षांच्या जे. के. फाईल्स कंपनीला टाळे

By मनोज मुळ्ये | Updated: September 9, 2023 13:34 IST

कायम कामगारांना सात लाखांमध्ये एक ते दोन लाखांची वाढ करून मोबदला देण्यावर तडजाेड

रत्नागिरी : उत्पादनाची मागणी घटल्याने घरघर लागलेल्या रत्नागिरी शहरानजिकच्या जे. के. फाईल्स कंपनीला ४६ वर्षांनी शुक्रवार (८ सप्टेंबर)पासून टाळे ठाेकण्यात आले. यामुळे शेकडो कामगार बेरोजगार झाले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कामगारांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न केला. त्याचा काही अंशीच परिणाम झाला.जे. के. फाईल्स या कंपनीत फाईल म्हणजे कानस बनवली जाते. धार करण्यासाठी याचा उपयोग होत होता. परंतु आधुनिक कटर आल्यामुळे त्याची मागणी कमी झाली. त्यामुळे जून महिन्यात कंपनी बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला. प्रथम कंत्राटी कामगारांना बाजूला करून कायमस्वरूपी कामगारांना ७ लाख रुपयांचा मोबदला देऊन ऐच्छिक निवृत्ती घेण्यासाठी प्रवृत्त केले. कामगारांनी बँकांकडून पाच ते दहा लाखापर्यंतची कर्ज घेतली आहेत. सात लाखामुळे आर्थिक ताळेबंद बसणारा नव्हता. त्यामुळे कायम कामगारांमधील नेत्यांची समिती नेमण्यात आली. या समितीमधील पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन व्यथा मांडल्या.

त्यानुसार पालकमंत्र्यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मुंबईत बैठकीचे आयोजन केले हाेते. मात्र, या बैठकीला कंपनीचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहिले नाहीत; परंतु उद्योगमंत्र्यांनी कामगारांना पंधरा ते वीस लाखाचा मोबदला मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली. याबाबत त्यांनी बैठक घेण्याचेही जाहीर केले हाेते.मात्र, ही बैठक होण्यापूर्वीच कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा झाली. या बैठकीनंतर कायम कामगारांना सात लाखांमध्ये एक ते दोन लाखांची वाढ करून मोबदला देण्यावर तडजाेड झाली. त्यानंतर कंपनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी