शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षिततेसाठी लोकांमध्ये स्वयंशिस्त निर्माण होणे गरजेचे

By शोभना कांबळे | Updated: August 23, 2023 15:37 IST

जिल्हा न्यायालयात आयोजित वाहतूक सुरक्षा जनजागृती कार्यक्रमात मान्यवरांनी केले विचार व्यक्त 

रत्नागिरी : केवळ शिक्षा करून, कारवाया करून वाहतूक शिस्तीचा प्रश्न सुटणार नाही, त्यासाठी लोकांमध्ये स्वयंशिस्त निर्माण हाेणे, लोकांनी स्वत:हून आपली व इतरांचीही सुरक्षितता सांभाळली पाहिजे. यादृष्टीने त्यांच्यात जागृती होणे गरजेचे असल्याचे मत वाहतूक आणि रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी व्यक्त केले.जिल्हा न्यायालयाच्या आवारात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा पोलिस दल यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी वाहतूक आणि रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य न्याय दंडाधिकारी राहूल चाैत्रे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव निखिल गोसावी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हनकर, जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, सहायक पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर आणि वकील बार संघाचे अध्यक्ष दिलीप धारिया, सरकारी वकील अनिरूद्ध फणसेकर आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते.प्रारंभी प्राधिकरणचे सचिव निखिल गोसावी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, अपघाताचे प्रमाण वाढत आहे. दुचाकीचे होणारे अपघात आणि त्यात होणारे मृत्यू हे केवळ आणि केवळ हेल्मेट न घातल्याने होत असल्याचे दिसून येते. युवा पिढी ही देशाचे भवितव्य असल्याने या पिढीने हेल्मेट घातलेच पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हनकर यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विविध जागृतीचे उपक्रम राबवीत असल्याने अपघातांची संख्या ३० टक्केपर्यंत खाली असल्याचे सांगितले. या कार्यालयाकडून सातत्याने जागृतीचे उपक्रम राबवीत असल्याची माहिती त्यांनी दिली.धनंजय कुलकर्णी यांनी न्यायाधीशांनीच महत्वाचे काम हाती घेतल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला धन्यवाद दिले. ते म्हणाले केवळ, दंड, चालान भरून, कारवाया करून दरवर्षी प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी लोकांमध्ये स्वयंशिस्त - जागृती होणे गरजेचे आहे.जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी वाहन चालविताना शरीर गाडीवर आणि मन दुसरीकडे भरकटत स्पष्ट केले. नागरिकांमध्ये काॅमन सेन्स असणे गरजेचे आहेत. वाहतुकीच्या नियमांबाबत त्यांच्यात जागरूकता निर्माण होण्याची गरज ज्यांनी व्यक्त केली.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांनी अध्यक्षीय भाषणात समाजातील सर्वच घटकांकडून याबाबत जागृती होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सह दिवाणी न्यायाधीश आर. बी. यादव यांनी आभारप्रदर्शन केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीroad safetyरस्ते सुरक्षा