शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पोटाची खळगी भरत नाही, थांबून तरी काय करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 13:54 IST

यापैकी बोरज येथील ठेकेदार कंपनीच्या कॅम्प ऑफिसच्या परिसरात राहणाऱ्या उपठेकेदाराच्या  ८० मजुरांपैकी १५ मजूर बुधवारी पायी रेल्वे रूळाचा आधार घेत चालत जाण्याचा तयारीत असताना वेरल ग्रामस्थांच्या लक्षात आले.

ठळक मुद्देखेडमधील आलेल्या मध्यप्रदेशातील मजुरांची केविलवाणी अवस्थाधोकादायक मार्ग पत्करून निघाले गावालाकेवळ अडीचशे रूपयावर राबत होते रस्त्याच्या कामासाठी आले होते खेडमध्ये

खेड : पोटाची खळगी भरण्यासाठी केवळ अडीचशे रुपयात दिवसभर राबणारे परप्रांतीय मजूर लॉकडाऊनमध्ये वाढलेल्या अन्नधान्याच्या किंमतीमुळे पोट भरू शकत नाहीत अशा अवस्थेत आहेत. जगणेच मुश्कील झाल्याने खेडमध्ये आलेल्या मध्यप्रदेशातील या मजुरांनी चालत गावी जाण्याचा धोकादायक मार्ग पत्करला आहे.मुंबई - गोवा महामार्गाच्या कशेडी ते परशुराम या ४४ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी अनेक परप्रांतीय कामगार ठेकेदारांच्या माध्यमातून काम करीत आहेत. यापैकी बोरज येथील ठेकेदार कंपनीच्या कॅम्प ऑफिसच्या परिसरात राहणाऱ्या उपठेकेदाराच्या  ८० मजुरांपैकी १५ मजूर बुधवारी पायी रेल्वे रूळाचा आधार घेत चालत जाण्याचा तयारीत असताना वेरल ग्रामस्थांच्या लक्षात आले. याची माहिती ग्रामस्थांनी सरपंच, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांना दिली. या मजुरांना ग्रामस्थांनी महामार्गावरच थांबवून ठेवले.याबाबत या मजुरांनी दिलेल्या माहितीनुसार, चार महिन्यांपूर्वी सुनील गौड या ठेकेदाराने दिवसाला अडीचशे रुपयांच्या मजुरीवर ८० मजुरांना महामार्गाच्या कामासाठी आणले होते. मध्यप्रदेश राज्यातील सिधी जिल्ह्यातील हे मजूर चार महिन्यांपासून येथे काम करीत आहेत. लॉकडाऊनच्या काळात महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र, दिवसभर काम करून मिळणारी मजुरी आणि रोजचा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने या मजुरांनी गाव गाठण्याचा निर्णय घेतला.खेडपासून त्यांच्या सिधी या जिल्ह्याच्या ठिकाणापर्यंतचे अंतर सुमारे १५०० किलोमीटर असल्याची माहिती त्यांनी दिली. गेले आठ दिवस केवळ भात व बटाटे उकडून खात असल्याची माहिती दिली. बुधवारी सकाळी हे १५ मजूर बोरज येथून महामार्गाने खेड रेल्वे स्टेशनजवळ पोहोचले. याठिकाणी ते रेल्वे रुळांचा आधार घेत पुढचा प्रवास करण्याच्या तयारीत होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस