शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

ओमानमध्ये अडकून पडलेले इकबाल पावसकर २७ वर्षानंतर मायदेशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 20:38 IST

आोमान येथे गेल्यानंतर तिथे कोसळलेल्या विविध संकटामुळे तब्बल २७ वर्षे तिथे अडकून पडले.

शोभना कांबळे

रत्नागिरी : आोमान येथे गेल्यानंतर तिथे कोसळलेल्या विविध संकटामुळे तब्बल २७ वर्षे या देशात अडकून पडलेल्या इकबाल पावसकर यांच्यासाठी देवदूत ठरलेल्या मुस्लीम वेल्फेअर समितीने त्यांना आपल्या मायदेशीच नव्हे तर रत्नागिरी नजिकच्या केळ्ये मजगाव येथील घरीही सुखरूप आणले. एवढेच नव्हे तर तिथल्या रूग्णालयात दाखल असल्याने झालेला खर्चही मोफत करायला लावला. यात मुस्लीम वेल्फेअर समितीचे अकील नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.

एखादी व्यक्ती परदेशात कामाला गेल्यानंतर तिथे कोसळलेल्या विविध संकटांमुळे मायदेशी परतण्याचे सर्व दोर कापले जातात. मात्र कर्मधर्म संयोगाने त्याच्या देशातील काही लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती मिळते आणि त्यांच्या मदतीने ही व्यक्ती तब्बल २७ वर्षानंतर पुन्हा आपल्या मायदेशी भारतात परतते. चित्रपटाच्या कथेप्रमाणे ही सत्यकथा आहे इकबाल पावसकर यांची आणि त्यांची तारणहार ठरलेली संस्था आहे लांजातील मुस्लिम वेल्फेअर सोसायटी आणि तिचे कार्याध्यक्ष अकिल नाईक व सहकारी. या सोसायटीच्या माध्यमातून सामाजिक काम करणारे अकिल नाईक हे नोकरी निमित्ताने परदेशात काम करतात. काही महिन्यापूर्वी ते ओमान देशात गेले होते.

यावेळी त्यांना इकबाल हसन पावसकर हे बेपत्ता असल्याचा फोटो व्हॉटसअ‍ॅपवर फिरताना दिसला. त्यावेळी काही व्यक्तींनी या फोटोबाबत चौकशी केली. अखेर ही व्यक्ती तेथील एका हॉस्पिटलमध्ये असल्याची माहिती मिळाली. अकिल नाईक तिथे गेले तेव्हा  इक्बाल पावसकर तिथे असल्याची माहिती मिळाली. मात्र त्यांच्याकडे ओळखपत्राचा कोणताही पुरावा नव्हता. त्यामुळे त्यांची ओळख पटवण्यात प्रचंड मेहनत घ्यावी लागली. पावसकर याचे हॉस्पिटलचे जवळपास ४-५ लाखांचे बिल झाले होते. हे बिल मुस्लीम वेल्फेअर सोसायटीच्या सदस्यांनी मोफत करुन घेतले.

तिथून त्यांना भारतात आणायचे कसे,असा प्रश्न निर्माण झाला.  कोणतीच कागदपत्रे नसल्याने  भारतात नेण्यासाठी पासपोर्ट काढणे कठीण झाले होते. मात्र, तेथील कामगार विभागाचे अहमद यांनी सुमारे ३ लाखापर्यंत दंड मुस्लिम वेलफेयर सोसायटी यांच्या सांगण्यावर माफ केला.  इंडियन एम्बसी सलालाचे प्रमुख एजन्ट सनानाथ थार यांच्या सहकार्यामुळे आऊट पासपोर्टसाठी मदत केली. पण काही पुरावा नसल्याने पासपोर्ट अडकला. अखेर मस्कत येथे कार्यरत असणारी AIM (डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल मिशन ) ओमानचे प्रकाश पंडित यांच्या प्रयत्नामुळे पावसकर यांचा पासपोर्ट तयार झाला आणि मुस्लिम वेलफेअर सोसायटीच्या माध्यमातून ते भारतात येण्यास निघाले.

इकबाल यांची मानसिक स्थिती बरोबर नसल्याने विमान प्रवासात त्यांचे लहान मुलासारखे पण त्रासदायक चाळे सुरू होते. अखेर कसाबसा हा प्रवास पार करत ते भारतात परतले आणि मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचे अकील नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने ते तब्बल २७ वर्षानंतर आपल्या कुटुंबात पोहोचले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी