शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयांची तपासणी करा : सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 14:43 IST

coronavirus, Uday Samant, Ratnagiri, hospital रत्नागिरी शहरातील बड्या रुग्णालयांमध्ये कोरोना उपचारासाठी अधिक पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच २८ खासगी कोरोना रुग्णालयांची तपासणी करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी जिल्हा शल्य चिकित्सकांना  दिल्या.

ठळक मुद्देखासगी रुग्णालयांची तपासणी करा : सामंतकोरोना उपचारासाठी अधिक पैसे घेतल्याच्या तक्रारी

रत्नागिरी : शहरातील बड्या रुग्णालयांमध्ये कोरोना उपचारासाठी अधिक पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच २८ खासगी कोरोना रुग्णालयांची तपासणी करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी जिल्हा शल्य चिकित्सकांना  दिल्या.रत्नागिरीतील नव्याने उभारण्यात आलेल्या नव्या बड्या खासगी रुग्णालयाबद्दल आपल्याकडे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तक्रारी येत असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

तसेच इतर खासगी रुग्णालयांमध्येही कोरोनाग्रस्त रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेत असल्याच्या तक्रारी पत्रकारांनीही यावेळी मांडल्या. नव्या बड्या रुग्णालयामध्ये प्रशिक्षित कर्मचारी नसल्याचे यावेळी सामंत यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी सामंत यांनी या रुग्णालयाबरोबरच जिल्ह्यातील खासगी कोरोना रुग्णालयांचे सर्वेक्षण करा, असे सांगितले.ते म्हणाले की, रुग्णांकडून जादा पैसे घेणे तसेच प्रशिक्षित नसलेल्या कर्मचाऱ्यांना काम करण्यास देणे, या बाबी गंभीर आहेत. सप्टेंबर महिन्यापासून या रुग्णालयाबद्दल तक्रारी येत आहेत. त्यामुळे या रुग्णालयाची चौकशी आधीच करणे गरजेचे होते. या जनता दरबारातही अनेक तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची आपण गंभीर दखल घेतली असून त्याची पूर्ण चौकशी करणार असल्याचे सामंत यांनी संगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरीhospitalहॉस्पिटल