शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

खेडमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 18:51 IST

khed, Police, Muncipal Corporation, Ratnagiri नगर परिषद क्षेत्रात मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली. शहरातील नाना-नानी पार्क जवळ, क्षेत्रपाल नगर, खांबतळे, महाड नाका, बसस्थानक परिसर, मुख्य बाजारपेठ व अन्य विविध प्रभागात पालिका कर्मचाऱ्यांनी अतिक्रमणे हटवली. ही मोहीम आगामी कालावधीत अशीच सुरू राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी दिली.

ठळक मुद्देखेडमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम तीव्रमोहीम आगामी कालावधीत अशीच सुरू राहणार

खेड : नगर परिषद क्षेत्रात मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली. शहरातील नाना-नानी पार्क जवळ, क्षेत्रपाल नगर, खांबतळे, महाड नाका, बसस्थानक परिसर, मुख्य बाजारपेठ व अन्य विविध प्रभागात पालिका कर्मचाऱ्यांनी अतिक्रमणे हटवली. ही मोहीम आगामी कालावधीत अशीच सुरू राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी दिली.खेड शहरात नगर परिषदेने परवानगी दिलेले खोकेधारक, खासगी मालकीची दुकाने, व्यापारी संकुलातील दुकानदारांनी दुकानाबाहेर केलेले गटार व रस्त्यावरील अतिक्रमण यांच्या विरोधात ३ रोजी धडक मोहीम हाती घेतली. जेसीबी व अतिक्रमण हटवण्यासाठी पालिका सफाई कर्मचारी यांना सोबत घेऊन सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी खेड बसस्थानक, बाजारपेठ परिसरात दुकानांची पाहणी करत ज्या ठिकाणी अतिक्रमण आढळले त्यातील काही ठिकाणी पालिका कर्मचाऱ्यांकडून अतिक्रमण हटवण्यात आले.

काही ठिकाणी दुकानदारांनी स्वतः अतिक्रमण काढून टाकण्याची तयारी दाखवल्याने त्यांना तत्काळ अतिक्रमण काढून टाकण्याची सूचना करण्यात आली. शहरात काही ठिकाणी पालिकेचे अधिकारी व दुकानदार यांच्यासोबत वादाचे प्रसंग उदभवले.या कारवाईबाबत माहिती देताना मुख्याधिकारी शिंगटे म्हणाले की, पालिकेच्या क्षेत्रात अतिक्रमणाच्या अनेक तक्रारी असून, रस्ते, गटारे यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी हाती घेतलेली मोहीम आगामी कालावधीत सुरूच राहणार आहे. किंबहुना ती अधिक तीव्र होणार आहे. सरकारी जागेवर अनधिकृतपणे केली बांधकामे नागरिकांनी स्वत: काढून टाकावीत अन्यथा पालिका त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता धडक कारवाई करेल. शहराला अतिक्रमण मुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :KhedखेडPoliceपोलिसMuncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी