शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

पेढे-परशुराम येथील जागेबाबत चौकशी समिती नेमावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 15:58 IST

Religious Places Ratnagiri- पेढे परशुराम येथील जागेच्या संदर्भात प्रशासनाने चौकशी समिती नेमावी आणि या समितीच्या माध्यमातून १९७२ साली पेढे परशुराम देवस्थानची नोंद घातली गेली, याची चौकशी करावी, अशी मागणी पेढे परशुराम येथील कुळांनी बुधवारी पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केली. या बैठकीला सुमारे ५० ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी चौपदरीकरणाचा मोबदलाही मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.

ठळक मुद्देपेढे-परशुराम येथील जागेबाबत चौकशी समिती नेमावीरत्नागिरीत पालकमंत्री यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ग्रामस्थांची मागणी

रत्नागिरी : पेढे परशुराम येथील जागेच्या संदर्भात प्रशासनाने चौकशी समिती नेमावी आणि या समितीच्या माध्यमातून १९७२ साली पेढे परशुराम देवस्थानची नोंद घातली गेली, याची चौकशी करावी, अशी मागणी पेढे परशुराम येथील कुळांनी बुधवारी पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केली. या बैठकीला सुमारे ५० ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी चौपदरीकरणाचा मोबदलाही मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.पेढे परशुराम येथील देवस्थानचा वाद गेल्या ४० वर्षांपासून सुरू झाला आहे. हे प्रकरण न्यायालय प्रविष्ठ असल्याने या ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुलांच्या शैक्षणिक तसेच अन्य कामकाजांसाठी आवश्यक ते दस्ताऐवज मिळत नसल्याने या ग्रामस्थांचा विकास खुंटला आहे. गेल्या चार वर्षांपासून हे ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. ग्रामस्थांनी पालकमंत्री परब यांच्यासमोर कैफियत मांडली. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम उपस्थित होते.यावेळी ॲड. परब यांनी ही बाब न्यायप्रविष्ठ असल्याचे या ग्रामस्थांसमोर नमूद केले. यावेळी या ग्रामस्थांनी १९७२ पूर्वी या जमिनीच्या सातबाऱ्यावर कोणतीच नोंद नव्हती. त्यानंतर १९७२ मध्ये त्यावर पेन्सिलने देवस्थानची नोंद करण्यात आली. ती कायम कधी झाली. याची चौकशी व्हावी. त्यानंतर या प्रश्नांचा १०० टक्के उलगडा होईल, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली.

ही कुळे गेल्या चार वर्षांपासून आपल्या न्यायासाठी लढा देत आहेत. मात्र, त्याची दखल अद्याप घेण्यात आलेली नाही. एक पिढी न्यायासाठी संपली आता दुसरी पिढीही यातच जाईंल, असे सांगितले. आम्हाला न्याय मिळवून द्या, असे सांगितले.यावेळी पालकमंत्री परब यांनी या ग्रामस्थांची मागणी रास्त असल्याचे सांगून जिल्हाधिकारी मिश्रा यांना महसूल विभागामार्फत यासंदर्भात माहिती घेण्याच्या सूचना केल्या. न्यायालयाच्या कक्षेतील हा विषय असल्याने यात निकाल लागेपर्यंत हस्तक्षेप करता येत नाही. मात्र, अशी समिती व्हावी, यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू. असे आश्वासन दिले.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेRatnagiriरत्नागिरी