शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

मत्स्य विद्यापीठाबाबत सर्वपक्षीयांकडून अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 14:42 IST

कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ देण्याच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या राजकीय पक्षांनी मत्स्य व्यवसाय विज्ञान विद्यापीठाकडेही पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. आधी आघाडी आणि मग युतीच्या सरकार पातळीवरून झालेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कोकणातील मत्स्य महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केलेल्या सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना फटका बसण्याची वेळ आली आहे. सगळ्याच पक्षांनी कोकणावर अन्याय करण्याचे धोरण राबवल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देमत्स्य विद्यापीठाबाबत सर्वपक्षीयांकडून अन्यायआजवर फक्त कागदपत्र रंगली, तब्बल १९ वर्षे झाल्या फक्त चर्चाच

मनोज मुळयेरत्नागिरी : कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ देण्याच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या राजकीय पक्षांनी मत्स्य व्यवसाय विज्ञान विद्यापीठाकडेही पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. आधी आघाडी आणि मग युतीच्या सरकार पातळीवरून झालेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कोकणातील मत्स्य महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केलेल्या सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना फटका बसण्याची वेळ आली आहे. सगळ्याच पक्षांनी कोकणावर अन्याय करण्याचे धोरण राबवल्याचे यातून स्पष्ट होत आहे.दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाच्या अखत्यारीत रत्नागिरीतील शिरगाव येथे १९८१ साली मत्स्य महाविद्यालय सुरू झाले. १९९८ साली महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र पशु आणि मत्स्य व्यवसाय विज्ञान विद्यापीठ अधिनियम केला आणि २००० साली हे विद्यापीठ कार्यरत झाले. हे विद्यापीठ नागपूर येथे सुरू करण्यात आले. त्याला नागपूर, उदगीर आणि रत्नागिरी अशी तीन मत्स्य महाविद्यालये जोडण्यात आली.विदर्भ (नागपूर), मराठवाडा (उदगीर) आणि कोकण (रत्नागिरी) अशा तीन महसुली विभागांसाठी हे विद्यापीठ नागपूरमधून कार्यरत करण्यात आले. त्याच्या प्रशासकीय बाबींसह अनेक मुद्द्यांवर आक्षेप घेण्यात आला. समुद्र कोकणात आणि मत्स्य विद्यापीठ नागपुरात अशा अजब कारभारावर जोरदार टीका झाल्यानंतर १७ नोव्हेंबर २००० रोजी सरकारने एक अध्यादेश काढला आणि मत्स्य विद्यापीठाच्या यादीतून रत्नागिरीच्या शिरगाव येथील महाविद्यालय वगळले.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे एक याचिका दाखल झाली होती. २००० साली स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ अस्तित्त्वात आल्यानंतरही शिरगाव मत्स्य महाविद्यालय त्याला जोडण्यात आले नसल्याने या महाविद्यालयाकडून २००० सालापासून देण्यात आलेल्या सर्व पदव्या रद्द करण्याची मागणी खंडपीठाकडे याचिकाकर्त्यांनी केली होती. त्यावर निकाल देताना खंडपीठाने शिरगाव महाविद्यालय नागपूर विद्यापीठाशी संलग्न करण्याबाबत दखल घेण्याचे आदेश सरकारला दिले. त्यातूनच आजवर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदव्यांचा प्रश्न बिकट झाला आहे.या सर्व प्रकरणाला आधी आघाडीचे आणि नंतर युतीचे सरकार जबाबदार आहे. अर्थात कोकणातील सर्वच पक्षांचे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवरील सदस्यांनीही या विषयाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.कोकण उपेक्षितखाऱ्या आणि निमखाऱ्या पाण्यातील मासेमारी कोकणातच होते. पण, त्याचबरोबर गोड्या पाण्यातील मासेमारीमध्येही ७0 टक्के वाटा कोकणाचाच (पालघर) आहे. मात्र, तरीही मत्स्य व्यवसाय विद्यापीठ नागपूरला नेण्याचा अट्टाहास दाखवला जातो आणि कोकणातील आमदार, खासदार मात्र याविषयी आवाज उठवत नाहीत. त्यामुळेच सरकार दरबारी कोकण उपेक्षित राहिले आहे.अजब निर्णयमुळात कोकणाला ७२0 किमी लांबीचा समुद्रकिनारा असतानाही मत्स्य विद्यापीठ नागपूरमध्ये सुरू करण्याचा अजब निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर त्यावेळी टीका झाली. मात्र, तरीही त्यात बदल झाला नाही. कोकणात मत्स्य विद्यापीठ सुरू करण्यात राजकीय पुढाऱ्यांना अपयशच आले. कोकणाला स्वतंत्र विद्यापीठ देण्याबाबत टाळाटाळ करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांनी मत्स्य विद्यापीठाबाबतही तेवढीच अक्षम्य टाळाटाळ केली आहे.भास्कर जाधव यांची आक्रमक भूमिका, सरकारला जाब विचारणारजुलै २0१८च्या पावसाळी अधिवेशनात आमदार भास्कर जाधव यांनी हा प्रश्न मांडला होता. त्यावेळी मत्स्य व्यवसाय खात्याचे मंत्री महादेव जानकर यांनी सभागृहात आश्वासन दिले होते की, हे महाविद्यालय सध्या कोकण कृषी विद्यापीठाशीच जोडलेले राहील आणि लवकरच कोकणाला स्वतंत्र मत्स्य व्यवसाय विज्ञान विद्यापीठ दिले जाईल. या अधिवेशनानंतर भास्कर जाधव यांच्या पायाला दुखापत झाली आणि पुढील दोन अधिवेशनांमध्ये ते उपस्थित राहू शकले नाहीत.

आता येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आपण या मुद्द्यावर सरकारला जाब विचारू आणि हा विषय मार्गी लावूनच घेऊ, अशी भूमिका आमदार जाधव यांनी घेतली आहे. शुक्रवारी मत्स्य पदवीधर संघटनेच्या विद्यार्थ्यांनी आमदार जाधव यांची चिपळूण येथे भेट घेतली आणि या विषयाबाबतची सद्यस्थिती त्यांच्यासमोर ठेवली.

हे महाविद्यालय नागपूरला जोडले जाऊ नये आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे कोकणासाठी स्वतंत्र मत्स्य व्यवसाय विज्ञान विद्यापीठ मिळावे, हीच मागणी या विद्यार्थ्यांनी आमदार जाधव यांच्याकडे केली आहे आणि त्यांनी त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आमदार उदय सामंत आणि आमदार राजन साळवी यांनीही या विषयात लक्ष घातले असून, मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्याचे आश्वासन दिले आहे.चार वेळा अधिवेशनात विषयआतापर्यंत चारवेळा या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले आहे. २00४, २00८, २0१४ आणि २0१८ अशा चार वेळी अधिवेशनात मत्स्य महाविद्यालय आणि नागपूरचे विद्यापीठ असा विषय चर्चेला आला. किंबहुना त्यावर चर्चा आणि निर्णय व्हावा, यासाठी हा विषय तेथे मांडला गेला. मात्र त्यावर पुढे काहीही न झाल्यानेच या महाविद्यालयाबाबत सध्याची दोलायमान स्थिती निर्माण झाली आहे.दिलासादायक निर्णय नाहीचज्या चारवेळा विषय मांडण्यात आला, त्यातील दोनवेळा आघाडीचे तर दोनवेळा युतीचे सरकार होते. मात्र, यातील कोणत्याही पक्षाच्या सरकारने कोकणाला कायमस्वरूपी दिलासा देणारा निर्णय घेतलेला नाही. हाच विषय नाही तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वतंत्र विद्यापीठ देण्याच्या विषयाकडेही असेच दुर्लक्ष करण्यात आले आहे. एकूणच कोकणाला दिलासा न देण्याचे धोरण सर्वच राजकीय पक्ष राबवत आहेत.अधिनियमाच्या कलमात सुधारणाच नाहीमुळात कोकणात मत्स्य व्यवसाय विज्ञान विद्यापीठ व्हावे, ही मागणी खूप जुनी मागणी आहे. मात्र, आजवर कोणत्याही सरकारने त्याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. नागपूर मत्स्य व्यवसाय विज्ञान विद्यापीठाची स्थापना करताना रत्नागिरीचे मत्स्य महाविद्यालय त्याला न जोडता त्याची संलग्नता दापोली कृषी विद्यापीठाशी कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनेच (२000 साली) घेतला होता.

मात्र, तरीही मत्स्य विद्यापीठ करताना काढलेल्या अधिनियमाच्या कलमात आवश्यक ती सुधारणा केली गेली नाही. त्यामुळे आता उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने संलग्नतेच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आता सरकारने कोकणासाठी स्वतंत्र मत्स्य व्यवसाय विज्ञान विद्यापीठाची स्थापना केली तरच या समस्या कायमस्वरूपी मिटणार आहेत.

टॅग्स :fishermanमच्छीमारRatnagiriरत्नागिरी