शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
2
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
3
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
4
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
5
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
6
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
7
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
8
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
11
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
12
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
13
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
14
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
16
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
17
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
18
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
19
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
20
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा

सहकारी संस्थांच्या नोंदणीची माहिती, कागदपत्रांची यादी एका क्लिकवर मिळणार

By शोभना कांबळे | Updated: May 27, 2025 18:31 IST

शोभना कांबळे रत्नागिरी : नागरिकांसाठीही आठ प्रकारच्या सहकारी संस्थांच्या नोंदणीचे निकष, त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी आणि आदर्श उपविधी यांची ...

शोभना कांबळेरत्नागिरी : नागरिकांसाठीही आठ प्रकारच्या सहकारी संस्थांच्या नोंदणीचे निकष, त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी आणि आदर्श उपविधी यांची माहितीही अगदी घरबसल्या व्हावी, या उद्देशाने जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डाॅ. सोपान बापू शिंदे यांनी ‘सहकार सोपान’द्वारे क्युआर कोड निर्माण केले असून, ते पीडीएफ स्वरूपात जिल्हा कार्यालयात तसेच या कार्यालयाच्या अखत्यारीतील सर्व तालुक्यांमधील कार्यालयात उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे ही माहिती घेण्यासाठी नागरिकांना उपनिबधंकांच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही.

जिल्हा उपनिबंधक (सहकार) डाॅ. सोपान शिंदे यांनी नागरिकांना सहकारसंदर्भातील कायदे, आदेश यांची माहिती होण्यासाठी अनुक्रमे सहकार सोपान क्युआर कोड ग्रंथालय आणि सहकार सोपान निर्णय संचयनी यांची निर्मिती राज्यभरातील सहकार विभागात वेगळा उपक्रम राबविला आहे. तसेच नागरिकांना विविध सहकारी संस्था स्थापन करताना नोंदणीचे निकष, कागदपत्रांची यादी आणि आदर्श उपविधी यांची माहिती घेण्यासाठी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी यायला लागू नये, या उद्देशाने डाॅ. शिंदे यांनी विविध पाच सहकारी संस्थांसाठी तसेच अन्य तीन बाबींच्या माहितीसाठी असे आठ स्वतंत्र क्युआर कोड तयार केले आहेत.आवश्यक असलेल्या सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी संबंधित क्युआर कोड मोबाइलवर स्कॅन करताच काही सेकंदातच सुमारे साडेपाचशे पानांची ही सर्व माहिती पीडीएफद्वारे मोबाइलवर दिसू लागते. त्यामुळे राज्यभरातील कुठलीही व्यक्ती अगदी या क्युआर कोडद्वारे सहकारी संस्थांच्या नोंदणीची माहिती घेऊ शकते. विशेष म्हणजे या सेवेसाठी कुठलेही शुल्क देण्याची गरज नाही.

क्युआर कोडवर माहिती बिगरशेती, नागरी, पगारदार पतसंस्था, प्राथमिक कृषी पतसंस्था, सर्वसाधारण संस्था, मजूर संस्था, गृहनिर्माण संस्था या पाच संस्थांच्या नोंदणीसाठी तसेच 'महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्स कायदा' (मोफा) अंतर्गत विकासक असहकार्याने नोंदणी, एकतर्फी मानीव हस्तांतरण आणि गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींचा पुनर्विकास अशा आठ बाबींची माहिती या क्युआर कोडवर उपलब्ध आहे.

नागरिक, सहकाराचे अभ्यासक, पक्षकार यांना विनाअर्ज, विनाशुल्क, विनासंपर्क आणि विनाविलंब ही माहिती उपलब्ध होण्यासाठी ‘सहकार सोपान’द्वारे विविध संस्थांची नोंदणी आणि अन्य विषयासंदर्भात क्युआर कोड उपलब्ध करून देण्यात आल्याने त्यांना या माहितीसाठी आमच्या कार्यालयांमध्ये येण्याची गरज नाही. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. सहकार सोपानचा अर्थ सहकाराचा मार्ग किंवा पायरी. या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा. - डाॅ. सोपान शिंदे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी