शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

हापूस आंब्याची आवक वाढल्याने दरात घसरण

By admin | Updated: March 18, 2016 23:32 IST

वाशी मार्केट : रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतून १६ हजार आंबा पेट्या दाखल

रत्नागिरी : वाढत्या उष्म्यामुळे आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. त्यामुळे वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी मार्केटमध्ये १६ हजार आंबा पेट्या विक्रीस उपलब्ध होत्या. आवक वाढल्यामुळे दरात घसरण झाली आहे. १००० ते १५०० रूपये डझन असलेला आंबा आता ३०० ते ८०० रूपये डझनवर येऊन ठेपला आहे. यामुळे आंब्यासाठी केलेला खर्च भरून कसा येईल याच विवंचनेत शेतकरीवर्ग सापडला आहे.गत आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे मोहोरावर तसेच फळांवर काळे डाग पडले आहेत. मोहोरावरील बुरशीसदृश्य रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी अद्याप शेतकऱ्यांना फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे आर्थिक खर्चात दिवसेंदिवस वाढच होत आहे. वाढता इंधनखर्च, मजुरी, कीटकनाशकांचा खर्च, खोका, हमाली, दलाली तसेच भाडेतत्वावर घेतलेल्या बागांसाठी मोजावे लागणारे पैसे, संबंधित सर्व खर्च जावून शेतकऱ्यांच्या हातात किती पैसे येणार हाच प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. फयानपासून दरवर्षी येनकेन प्रकारे आंबा पिकाचे उत्पादनात नैसर्गिक परिस्थितीमुळे घट होत आहे. उष्म्यामुळे फळ तयार होण्याच्या प्रक्रियेबरोबर भाजण्याचा धोका देखील वाढला आहे. फळांवर काळे डाग पडत असून, आंबा गळून जमिनीवर पडत आहे. काळे डाग असलेला आंबा मार्केटमध्ये चालत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. दरवर्षी शासनाकडे शेतकरी समस्या मांडत असतात. परंतु शासनाकडून तुटपंूजी आर्थिक मदत देऊ केली जाते. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आखडता हात घेतला जातो. शासनाला शेतकऱ्यांना मदत करता येत नसेल, तर दरावरती निर्बंध आणावेत. जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल.सध्या वाशी मार्केटमधून आखाती प्रदेशात निर्यात सुरू करण्यात आली आहे. परदेशातील व्यापाऱ्यांकडून आंब्याला मागणी होत असली, तरी पुरवठा करण्यात शेतकरी कमी पडत आहेत. वास्तविक पुर्नमोहोर प्रक्रियेमुळे सुरूवातीचा आंबा गळून गेल्यामुळे शेतकऱ्यांकडे आंबा कमी आहे. सध्या वाशी मार्केटमध्ये रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतून १६ हजार पेट्या दिवसाला विक्रीसाठी येत आहेत. (प्रतिनिधी)ढगाळ हवामानामुळे आंब्याचा मोहोर काळा पडला आहे. खारसदृश्य बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. संबंधित बुरशी रोखण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार फवारणी करावी लागत आहे. अद्याप शेतकऱ्यांना फवारणी करावी लागत असल्यामुळे खर्च वाढला आहे. मोहोरावरील बुरशी फळांवर येत असल्यामुळे काहीवेळा फळेदेखील पुसावी लागत आहेत.एस. पी. सावंत, शेतकरी.